त्यावेळी Jagdeep Dhankhar यांनी अचानक राजकीय प्रवास थांबवला, अन्...

Jagdeep Dhankhar| जगदीप धनखड हे देशाचे 14 वे उपराष्ट्रपती असणार आहे.
Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankhar

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) बहुमतांनी विजयी झाले.धनखड यांना 528 तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना 182 मतं मिळाली. या विजयानंतर धनखड देशाचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून 11 ऑगस्टला शपथ घेतील. तर विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे.

निकलानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी संध्याकाळी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. याशिवाय नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही जगदीप धनखड यांना त्यांचं विजयासाठी अभिनंदन केलं. जगदीप धनखड 528 मतांनी विजयी झाले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 725 मतं पडली. 710 मतं वैध तर 15 मतं अवैध ठरली. आता जगदीप धनखड हे देशाचे 14 वे उपराष्ट्रपती असणार आहे.

Jagdeep Dhankhar
Shiv Sena : कोकणात पुन्हा भूकंप; माजी आमदाराने डागली तोफ

जगदीप धनखड यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला

राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील एका दुर्गम गावात शेतकरी कुटुंबात जगदीप धनखड यांचा जन्म झाला. चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले. धनखर यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि देशातील सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत झुनझुनू येथून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी 1990 मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. 1993 मध्ये अजमेर जिल्ह्यातील किशनगड मतदारसंघातून ते राजस्थान विधानसभेत पोहोचले. धनखर हे क्रीडाप्रेमी म्हणूनही ओळखले जातात आणि ते राजस्थान ऑलिम्पिक असोसिएशन आणि राजस्थान टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत.

Jagdeep Dhankhar
Shiv sena : शिंदे गटात गेलेल्या आमदाराला घरातूनच आव्हान ; पाचोऱ्यात राजकीय भूकंप ?

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी धनखर यांच्या नावाची घोषणा करताना भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले होते की, धनखर जवळपास तीन दशकांपासून सार्वजनिक जीवनात आहेत. यावेळी त्यांनी धनखड यांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा मुलगा' असा केला होता. विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शेवटची अखिल भारतीय बैठकही धनखड यांच्या जिल्हा झुनझुनू येथे झाली होती. त्यांच्या काळातील बहुतेक जाट नेत्यांप्रमाणेच धनखडचा यांच्यावरही देवीलाल यांचा प्रभाव होता. 1989 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या झुनझुनू संसदीय मतदारसंघातून देवीलाल यांनी त्यांना विरोधी उमेदवार म्हणून उभे केले आणि निवडणूकीत विजय मिळावला. तिथून धनखड यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. त्यानंतर धनखड यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

1990 मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये धनखड केंद्रीय मंत्री झाले. पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजस्थानच्या राजकारणात अशोक गेहलोत यांचा प्रभाव वाढल्याने धनखड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते लवकरच वसुंधरा राजेंच्या निकटवर्तीय बनले. पण अचानक धनखड यांनी राजकीय प्रवास थांबवला. त्यानंतर जवळपास दहा वर्षे त्यांनी त्यांनी त्यांच्या कायदेशीर कारकिर्दीवर अधिक लक्ष केंद्रित केले. अखेर धनखड यांची जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ते राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यासाठी अनेकदा चर्चेत आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com