महाराष्ट्रासाठी आणखी एक धक्कादायक आणि लाजिरवाणी बातमी आहे. भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र भ्रष्टाचारी राज्यांमध्ये अव्वल ठरला असून, ही बाब पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणावह नाही. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या 2022 च्या वार्षिक अहवालातील या आकडेवारीने राज्यात खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे 949 गुन्हे नोंदवण्यात आले, तर 2021 मध्ये 773 गुन्ह्यांची नोंद झाली होती. कोरोना काळात म्हणजे 2020 मध्ये महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे 664 गुन्हे नोंदवण्यात आले होते. गंभीर बाब म्हणजे नोंद झालेल्या 949 गुन्ह्यांपैकी 94 टक्के प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत, तर गुन्हे उघड होण्याचे प्रमाण केवळ 8.2 टक्के आहे.
यातील गंभीर बाब म्हणजे 2022 मध्ये भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंद झाल्यानंतर केवळ दोन सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेतून दूर करण्यात आले, तर केवळ सहा सरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली. म्हणजेच भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षेचे प्रमाण किती अत्यल्प आहे, याची ही साक्षच आहे.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने 2022 मधील आत्महत्येचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यातही महाराष्ट्र पुढे होता. महाराष्ट्रात 2022 मध्ये तब्बल 1 लाख 70 हजार 924 आत्महत्या झाल्या होत्या. त्यानंतर आता भ्रष्टाचारातही महाराष्ट्र नंबर वन ठरणे, ही नक्कीच लाजिरवाणी बाब आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोंदवण्यासाठी एक अॅप विकसित केले आहे. शिवाय 1064 या हेल्पलाइनवर तक्रार करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.