राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अंतरिम बजेट सादर केले. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. यातील पहिली घोषणा होती ती अयोध्येतील महाराष्ट्र भवनची आणि दुसरी घोषणा होती ती जम्म-काश्मीरमधील महाराष्ट्र भवनची. या दोन्ही राज्यांत महाराष्ट्र सरकार भवन बांधणार असून त्यासाठी आर्थिक तरतुदींची घोषणा अजित पवारांनी केली. अजित पवारांनी ही घोषणा करताच सभागृहात 'जय श्रीराम' अशा घोषणा सुरू झाल्या. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा चेहरा फुलला होता. (Maharashtra Assembly budget session)
अजित पवार बजेट सादर करताना महाराष्ट्राला काय काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. बरोबर 2 वाजून 42 मिनिटांनी अजित पवारांनी (Ajit Pawar) उत्तर प्रदेशमधील अयोध्या आणि जम्म-काश्मीरमधील श्रीनगर येथील महाराष्ट्र भवनबाबत महत्त्वाची घोषणा केली.
महाराष्ट्रातील पर्यटक आणि भाविकांनी अयोध्या आणि श्रीनगरमध्ये सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) उभारले जाणार असून त्यासाठी 77 कोटींची तरतूद केल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने दोन्ही ठिकाणी मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेतल्याचेही अजित पवारांनी सांगितले.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) मुंबईत आले होते. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवनसाठी जागा देण्याची मागणी केली होती. त्याला योगी आदित्यनाथ यांनी राजभवनध्येच तत्वत: मान्यता दिली होती.
तत्पूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना अयोध्या दौऱ्यात त्यांनी 8 मार्च 2020 रोजी अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा देण्याची मागणी केली होती. तेव्हा त्यांच्यासोबत एकनाथ शिंदेही होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जून 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळी महाराष्ट्र भवनसाठी भूखंड देण्याची मागणी त्यांनी नायब राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये भारत-पाकिस्तानच्या सीमेवर कूपवाडामध्ये शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ते पुन्हा काश्मीरला गेले होते. तेव्हा राज्यपाल मनोज सिन्हा (Lt Governor of Kashmir Manoj Sinha) यांनी महाराष्ट्र भवनसाठी भूखंड देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं होतं.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.