DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून खूशखबर; महागाई भत्त्यात 2% वाढ जाहीर

DA Hike News : ही वाढ 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार लागू केली गेली आहे आणि ती 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
DA Hike
DA HikeSarkarnama
Published on
Updated on

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी (पेंशनर्स) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) २ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आता DA/DR 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर गेला आहे. ही वाढ 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार लागू केली गेली आहे आणि ती 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.

किती होणार वेतनवाढ?

या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. उदाहरणार्थ: जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 50,000 असेल, तर आधी त्याला 53% प्रमाणे 26,500 DA मिळत होता. आता 55% प्रमाणे 27,500 मिळेल. म्हणजेच 1,000 वाढ.

70,000 बेसिक सॅलरीवर आधी 37,100 DA मिळत होता, तो आता 38,500 होईल. म्हणजे 1,400 वाढ. 1,00,000 बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्याला आता 55,000 DA मिळेल.

DA Hike
Central Amends Key Pension Rules:...तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, सरकारने केले मोठे बदल

78 महिन्यांत प्रथमच केवळ 2% वाढ

गेल्या सहा-सात वर्षांत DA मध्ये सामान्यतः 3% किंवा 4% वाढ केली जात होती. मात्र, 78 महिन्यांमध्ये प्रथमच DA मध्ये केवळ 2% वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 2018 मध्येच अशा प्रकारची 2 टक्क्यांची वाढ झाली होती.

DA Hike
New Rules 2025 : LPG ते EPFO; 1 जूनपासून बदलणार 'हे' 6 नियम; तुमच्या खिशावर थेट परिणाम

दोन महिन्यांचा एरिअर मिळणार

मार्चमध्ये हा निर्णय घोषित झाल्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 या दोन महिन्यांचा एरिअर देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यात मार्चच्या पगारासोबत दिला जाणार आहे. उदाहरणार्थ, ज्याची बेसिक सॅलरी 19,000 आहे, त्याला पूर्वी 10,070 DA मिळत होता, तो आता 10,450 होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com