Karnataka Election Result 2023 माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव

Karnatak Elelction result Latest news | विधानसभा निवडणुकांपुर्वी जगदीश शेट्टर यांनी रविवारी (16 एप्रिल) त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता.
Karnatak Elelction result Latest news
Karnatak Elelction result Latest news Sarkarnama

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटकातील हुबळी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच महेश तेंगीनाकाने जगदीश शेट्टर यांना मागे टाकत चांगली आघाडी घेतली. महेश टेंगीनाका यांना 64910 मते मिळाली. तर शेट्टर यांना 29340 मते मिळाल्याची माहिती आहे. (Defeat of former Chief Minister Jagdish Shettar)

अजूनही मतमोजणी सुरू असल्याने हे आकडे झपाट्याने बदलत आहेत, मात्र असे असतानाही शेट्टर मागे राहिल्याने त्यांची आणि काँग्रेस समर्थकांची निराशा झाली आहे. या जागेवरून आम आदमी पक्षाचे विकास सोप्पीन यांना 197 तर NOTA ला 474 मते मिळाली आहेत. (Karnataka Elelction Result 2023 )

Karnatak Elelction result Latest news
Karnataka Election Result 2023 : बेळगाव दक्षिणमध्ये कमळ फुललं ; अभय पाटील विजयी ; एकीकरण समितीचे कोंडूसकर पराभूत

विधानसभा निवडणुकांपुर्वी जगदीश शेट्टर यांनी रविवारी (16 एप्रिल) त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. लिंगायत समाजातील जगदीश शेट्टर यांनी रविवारी रात्री काँग्रेस नेत्यांची भेट घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जगदीश शेट्टर यांनी रविवारी सांगितले की, त्यांना पक्षाच्या हायकमांडने राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर दिली होती, जी त्यांनी नाकारली. (Jadish Shettar)

शेट्टर यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा म्हणाले, "आम्ही त्यांना (जगदीश शेट्टर) कर्नाटकचे मुख्यमंत्री केले आणि आम्ही त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष केले." त्यांच्या विधानांनी आम्हालाही दु:ख झाले आहे. भाजपमुळेच जगदीश शेट्टर जनतेत प्रसिद्ध झाले. जगदीश शेट्टर यांना कर्नाटकची जनता कधीही माफ करणार नाही.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com