कुन्नूर (तामिळनाडू) : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे काल हेलिकॉप्टर अपघतात निधन झाले. काल दुपारी १२ वाजून ४० मिनीटांनी तामिळनाडूतील कुन्नूरजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या अपघातामध्ये बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधूलिका यांच्यासह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात बचावलेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्या निधन झालेल्या सर्वांना आज विलींग्टन कॉलेजमध्ये मानवंदना देण्यात आली.
दरम्यान हि मानवंदना देताना विलींग्टन कॉलेजच्या परिसरातील वातावरण गदगद झाले होते. कारण काल CDS रावत यांना जिथं उभा राहून मार्गदर्शन करायचं होतं तिथं आज त्यांचे पार्थिव नेण्यात आले. तिथं त्यांना सैन्याकडून अत्यंत भावूक वातावरणात मानवंदना देण्यात आली. विषेश म्हणजे रावत यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण ही याच कॉलेजमध्ये झाले आहे.
जनरल बिपीन रावत हे काल तामिळनाडूच्या निलगीरी पर्वत रांगेत वसलेल्या डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज (DSSC) विलींग्टन याठिकाणी तिथले प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निघाले होते. परंतु जाताना तमिळनाडूतील कुन्नूरजवळ अपघात झाला. रावत यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधूलिका, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरूसेवक सिंग, नायक जितेंद्र सिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही उपस्थित होते.
बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव आज संध्याकाळी दिल्लीत आणले जाणार आहे. त्यानंतर शुक्रवारी दोघांचेही पार्थिव त्यांच्या घरी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत अंत्यदर्शानासाठी नेण्यात येणार आहेत. यानंतर कामराज मार्गावरुन दिल्ली छावणीतील बराड स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. रावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठे मंत्री, नेते, सैन्यातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.