दिल्ली : चीफ ऑफ डिफेन्स (CDS) स्टाफ जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे काल तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. रावत यांच्या दुःखद मृत्यूनंतर कोण याची चर्चा आता सुरु झाली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चीफ ऑफ डिफेन्ससारखे महत्वाचे पद फार काळ रिकामे ठेवता येणार नाही. दरम्यान आता या महत्वाच्या पदी मराठी माणूस येणार असल्याचे जवळपास निश्चीत झाले आहे.
जनरल रावत यांचे उत्तराधिकारी म्हणून दोन मराठी अधिकाऱ्यांची नाव समोर येत आहेत. यात लष्कर प्रमुख मनोज मुकूंद नरवणे (manoj naravane) आणि भारतीय वायूदल प्रमुख व्ही.आर.चौधरी (V.R. Chaudhari) या दोन अधिकाऱ्यांचे नाव समोर येत आहे. काल हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक झाली. यात रावत यांच्यासह मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र सुरक्षा समितीच्या पुढील बैठकमध्ये नव्या सीडीएसवर चर्चा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या दोन नावांमध्येही लष्कर प्रमुख मनोज मुकूंद नरवणे यांचे नाव आघाडीवर आहे. या मागील महत्वाचे कारण म्हणजे नरवणे हेच सध्या देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आहेत. सोबत जनरल रावत यांनी मागील काही काळात सुरु केलेल्या प्रोजेक्ट्सबाबत नरवणे यांना माहिती अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वाधिक अनुभव देखील जनरल नरवणे यांचाच आहे. तर दुसऱ्या बाजूला वायूदल प्रमुख व्ही.आर.चौधरी यांनी अलिकडेच वायूसेनेची जबाबदारी हाती घेतली आहे. नौदल प्रमुख आर हरीकुमार यांनीही ३० नोव्हेंबरला सूत्र स्विकारली आहेत. त्यामुळे नरवणे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.
नव्या CDSच्या नावाची बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारानंतर घोषणा?
बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव आज संध्याकाळी दिल्लीत आणले जाणार आहे. दोघांवरही उद्या (शुक्रवारी) दिल्लीतील छावणी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारानंतरच सीडीएस पदावर जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.