Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण केले होते.
याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. राणा दाम्पत्य सतत सुनावणी स्थगित करण्याची विनंती करत आहे. सतत सुनावणीस स्थगिती मागितल्यानं उच्च न्यायालयानं राणा दाम्पत्याला गुरूवारी तंबी दिली.
हनुमान चालीसा प्रकरणातून आपल्याला आरोपमुक्त करावे, यासाठी राणा दाम्पत्यानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याला आरोपमुक्त करण्यास नकार दिल्यानं त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
याप्रकरणी गुरूवारी उच्च न्यायालयात (High Court) सुनावणी पार पडली. पण, राणा दाम्पत्याकडून सतत सुनावणी स्थगित करण्याची विनंती करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयानं राणा दाम्पत्याला सुनावलं आहे.
"ही अखेरची संधी आहे. आणखी एकदा याचिका सुनावणीस स्थगिती मागितली, तर त्याची किंमत मोजावी लागेल," असा इशारा उच्च न्यायालयानं राणा दाम्पत्याला दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हनुमान चालीस पठण करू, असं राणा यांनी जाहीर केलं होतं. पण, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना त्यांच्या खार येथीच घरातच अडविले. पण, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्यानं पोलिसांनी राणा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.