Assembly Election Campaign : कुणी 100, कुणी 1000 रुपये द्या! खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनच निवडणुकीसाठी क्राऊड फंडिंग

Delhi CM Atishi Crowd Funding for Election : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणुकीसाठी लोकांकडून पैसे मागितले आहेत.
Aatishi Crowdfunding
Aatishi CrowdfundingSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : कोणतीही निवडणूक म्हटलं की, लाखो रुपये खर्च आला. उमेदवार, पक्षाकडे किती पैसा आहे, यावर प्रचाराचे संपूर्ण गणित अवलंबून असते. अधिकाधिक मतदारांपर्यंत विविध माध्यमातून पोहचता यावे, यासाठी अनेक उमेदवारांकडून पाण्यासारखा पैसा ओतला जातो. पण त्याला काही उमेदवार अपवादही आहेत. मुख्यमंत्रिपदावर असलेल्या एका उमेदवाराने लोकांकडून पैसे मागत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची धूम आहे. राज्यात आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे. प्रचारामध्ये आपने मोठी आघाडी घेतली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी तगडे उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे यावेळी आतिशी यांच्यासाठी निवडणूक कठीण मानली जात आहे.

Aatishi Crowdfunding
Delhi BJP Candidates List: आप अन् काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या 8 जणांना तिकीट; दिल्लीसाठी BJP ची दुसरी यादी जाहीर

आतिशी यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता प्रचारासाठी पैसा हवा आहे, असे आवाहन मतदारांना केले आहे. निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे किंवा इतर वस्तू वाटतात, असा अनेकदा आरोप होतो. पण मुख्यमंत्रिपदावर असलेल्या आतिशी यांनी लोकांकडून 100 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत मदत देण्याचे आवाहन केले आहे.

आतिशी यांच्याकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी 40 लाख रुपये जमविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आतिशी म्हणाल्या, दिल्लीतील लोकांनी आपला नेहमी पाठिंबा देत निवडणूक लढण्यासाठी पैसे दिले आहे. लोकांच्या छोट्या-छोट्या मदतीने आम्हाला निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी मदत झाली आहे. संपूर्ण देशातील लोकांनी पक्षाला दान दिले आहे.

Aatishi Crowdfunding
Bangladesh Yunus government News : युनूस सरकारने मान्य केली मोठी चूक! सात हजारांहून अधिक जणांच्या मृत्यूबाबत म्हटले की...

आम्ही कधीही उद्योजकांकडून पैसे मागितले नाहीत. केजरीवाल सरकारने सामान्य जनतेसाठी काम केले. कारण ते आम्हाला लढण्यासाठी मदत करतात. आम्ही दिग्गजांकडून पैसे घेतले असते तर लोकांना मोफत पाणी, वीज, मोहल्ला क्लिनिक, शिक्षण देऊ शकलो नसतो, असे आतिशी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com