Delhi Assembly Elections : दिल्लीत प्रचाराचा धुमधडाका; नेत्यांनी गल्लीबोळही सोडलं नाही...

Delhi Assembly Election Campaign Ends : दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी, भाजप आणि काँग्रेससह सत्ताधारी आम आदमी पक्षानेही निवडणूक घोषणांचा पाऊस पाडला आहे.
Delhi Vidhansabha Election 2025
Delhi Vidhansabha Election 2025 Sarkarnama
Published on
Updated on

दिल्ली विधानसभा निवडणुका प्रचाराचा तोफा आज आज संध्याकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, भाजपने आणि आम आदमी पक्षाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी, भाजप आणि काँग्रेससह सत्ताधारी आम आदमी पक्षानेही निवडणूक घोषणांचा पाऊस पाडला आहे.

प्रचाराच्या तोफा

दिल्लीतील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे सर्वच पक्षांनी रोड शो आणि रॅलींचा धडाका लावला आहे. शेवटच्या दिवशी आम आदमी पक्षाच्या नऊ रॅली आणि रोड शो होणार आहे. तर भाजपकडून (BJP) 22 रॅली होणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना अतिशय कडेकोटपणे आचारसंहितेचं पालन करावं लागणार आहे. कारण संध्याकाळी सहा वाजेपासून कोणत्याही प्रकारे प्रचार केल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे.

Delhi Vidhansabha Election 2025
Sustainable Development on Budget : शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी

दिल्ली विधानसभेसाठी (Vidhan Sabha Election) आता येत्या 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे दिल्ली वासीयांसोबतच अख्या देशाचे लक्ष लागलं.

Delhi Vidhansabha Election 2025
Union Budget 2025 : मोदी सरकारने अर्थसंकल्पातून सर्वाधिक निधी कोणत्या क्षेत्रासाठी दिला माहीत आहे का?

दिल्ली काबीज करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दिल्ली निवडणूक कशी जिंकायची यासाठी सर्व पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. त्यात 27 वर्षांचा वनवास संपवण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. आम आदमी पक्ष विजयाच्या हॅट्रिकसाठी उत्सुक आहे. त्याच वेळी, काँग्रेसलाही आपला वनवास संपवायचा आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध आप आणि काँग्रेस अशी काँटे की टक्कर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com