Union Budget 2025 : मोदी सरकारने अर्थसंकल्पातून सर्वाधिक निधी कोणत्या क्षेत्रासाठी दिला माहीत आहे का?

Modi Government Union Budget 2025 : जाणून घ्या, अर्थसंकल्पातून कोणत्या क्षेत्रासाठी किती निधी मंजूर केला गेला आहे?
Union Budget and Ministries
Union Budget and MinistriesSarkarnama
Published on
Updated on

India Defence Budget 2025 - 2026: देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला. या अर्थसंकल्पात महिला, वृद्ध, शेतकरी, नोकरदारांशी सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या गेल्या. परंतु तुम्हाला माहीत आहे का, अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी कोणत्या क्षेत्रासाठी मंजूर केला गेला.

मोदी सरकारने(Modi Goverment) यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी देशाच्या सुरक्षेसाठी दिला. मागील काळात जगभरात निर्माण झालेली युद्धपरिस्थिती, भारताचे चीन आणि पाकिस्तानसोबतचे संबंध पाहता, देशाच्या सुरक्षेत मोदी सरकारला कोणतीही कसर सोडायची नाही. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने 2025-26साठी संरक्षण क्षेत्रासाठी तब्बल 6,81,210 कोटी रुपये मंजूर केले. जी चालू आर्थिक वर्षासाठी 6.22 कोटी वाटपाच्या तुलनेत किरकोळ वाढ आहे. याचे महत्त्व यासाठी अधिक आहे कारण, भांडवली खर्चासाठी एकूण 1,92,387 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. या रकमेतून मोठ्या प्रमाणात नवीन शस्त्रे, विमाने, युद्धनौका आणि इतर लष्करी उपकरणे खरेदी केली जातील.

Union Budget and Ministries
Defense Budget 2025: केंद्र सरकारने वाढवले 'संरक्षण बजेट'; 6,81,210 कोटी रुपयांची तरतूद

वर्ष 2024-25मध्ये भांडवली खर्च 1.72 लाख कोटी रुपये होता आणि सुधारित अंदाजानुसार ही रक्कम 1,59,500 कोटी रुपये आहे. जी दर्शवते की जवळपास 13,500 कोटी रुपये अद्याप खर्च झालेले नाहीत. पुढील आर्थिक वर्षासाठी दैनंदिन कामकाज आणि पगारावरील महसुली खर्च 4,88,822 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. ज्यामध्ये पेन्शनसाठी 1,60,795 कोटी रुपये समाविष्ट आहेत.

वर्ष 2025-26मध्ये संरक्षण अर्थसंकल्पासाठी तरतूद अंदाजे जीडीपीच्या 1.91 टक्के असण्याचा अंदाज आहे. भांडवली खर्चाअंतर्गत लढाऊ विमाने आणि त्यांच्या इंजिनासाठी 48,614 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. तर नौदलाच्या ताफ्यासाठी 24,390 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. इतर उपकरणांसाठी 63,099 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. नौदल प्रकल्पांसाठी 4,500 कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. वर्ष 2024-25 मध्ये सरकार संरक्षण बजेटसाठी 6,21,940 कोटी रुपये वाटप केले होते.

Union Budget and Ministries
Chhagan Bhujbal on Union Budget 2025: ''हा अर्थसंकल्प...'' ; छगन भुजबळांची केंद्रीय अर्थसंकल्पावर विशेष प्रतिक्रिया!

1) संरक्षण - 6,81,210 कोटी 2) ग्रामीण विकास - 2,66,817 कोटी 3) गृह मंत्रालय - 2,33,211 कोटी 4) शेती आणि संबंधित उपक्रम - 1,71,437 कोटी 5) शिक्षण - 1,28,650 कोटी 6) आरोग्य - 98,311 कोटी 7) शहर विकास - 96,777 कोटी 8) माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार - 95,298 कोटी 9) उर्जा - 81,174 कोटी 10) वाणिज्य और उद्योग - 65,553 कोटी 11) समाजकल्याण - 60,052 कोटी 12) वैज्ञानिक विभाग - 55, 679 कोटी

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com