Delhi Audi Car Accident : संतापजनक! मद्यधुंद कार चालकाने फूटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडलं

Audi car accident in Delhi’s : वसंत विहार येथील अपघाताची माहिती एका व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन चालक उत्सव शेखर याला अटक केली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, एक पांढरी ऑडी कार भरधाव वेगाना आली आणि रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडले.
Delhi  Vasant Vihar accident
Scene from Vasant Vihar where a speeding Audi car driven under the influence ran over footpath dwellers, killing 5 laborersSarkarnama
Published on
Updated on

Delhi News, 13 Jul : देशाची राजधानी दिल्ली येथे एका भरधाव ऑडी कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी मध्य रात्री पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मद्यधुंद ड्रायव्हरचे ऑडी कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिल्लीतील वसंत विहारमधील शिवा कॅम्प समोर हा अपघात घडला आहे.

Delhi  Vasant Vihar accident
MNS Shivsena UBT Alliance : आता संभ्रम नको, राज ठाकरेंनी स्वतः समोर येऊन..., युतीबाबत ठाकरे गटाची रोखठोक भूमिका

या अपघाताची माहिती एका व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन चालक उत्सव शेखर याला अटक केली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, एक पांढरी ऑडी कार भरधाव वेगाना आली आणि रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडले.

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर पोलिसांनी घटनास्थळावरून चालकासह कार ताब्यात घेतली आहे. या अपघातात लाधी (40), त्याची मुलगी बिमला (8), सबामी उर्फ चिरमा (45), राम चंद्र (45) आणि त्याची पत्नी नारायणी (35) यांचा समावेश असून हे सगळे मूळचे राजस्थानचे रहिवासी असून दिल्लीत मजुरी करतात.

Delhi  Vasant Vihar accident
Ujjwal Nikam : मोठी बातमी! अ‍ॅड. उज्वल निकम यांची खासदारपदी निवड, मीनाक्षी जैन, हर्षवर्धन श्रृंगला यांनाही संधी

चालक उत्सव शेखर याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. धक्कागायक बाब म्हणजे पोलिसांनी ऑडी कार चालवरा उत्सव शेखर अपघातावेळी नशेत असल्याचं वैद्यकीय चाचणीतून हे समोर आले आहे. त्यामुळे आरोपी चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com