Delhi Car Blast: घातपाताचा संशय! सकाळी 2900 किलो बॉम्ब बनवायचं साहित्य मिळालं अन् संध्याकाळी झाला स्फोट; दिल्लीत नेमकं काय घडलं?

Delhi Car Blast: राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्टेशन परिसरात एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. यानंतर तीन ते चार वाहनांना आग लागली त्यामुळं आगीचे मोठे लोळ उठताना दिसत आहेत.
Delhi Blast
Delhi Blast
Published on
Updated on

Delhi Car Blast: राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्टेशन परिसरात एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. यानंतर तीन ते चार वाहनांना आग लागली त्यामुळं आगीचे मोठे लोळ उठताना दिसत आहेत. पण हा शक्तीशाली स्फोट असल्यानं जवळच्या इमारतींच्या काचा फुटल्या, तसंच रस्त्यावरील दिवेही तडकल्याचं दिसून आलं आहे. त्यातच सकाळीच हरियाणाच्या फरिदाबाद इथून मोठ्या प्रमाणावर अमोनियम नायट्रेट सुरक्षा यंत्रणांकडून जप्त करण्यात आलं आहे. हा पदार्थ स्फोटकं तयार करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळं दिल्लीत झालेल्या स्फोटामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळी नेमकं काय घडलं?

जम्मू आणि काश्मीर पोलीस तसंच हरयाणा पोलिसांनी सोमवारी सकाळी केलेल्या संयुक्त कारवाईत दिल्लीतील फरीदाबाद इथं २९०० किलो अमोनियम नायट्रेट जप्त केलं. हा रासायनिक पदार्थ स्फोटकं किंवा बॉम्ब बनवण्यासाठी वापलं जातं. त्याचबरोबर घातक रायफल्स तसंच मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसे देखील आढळून आली आहेत. हरयाणामधील फरिदाबाद इथल्या एका मेडिकल कॉलेजशी संबंधित डॉक्टरांकडं या वस्तू आढळून आल्या आहेत.

Delhi Blast
Delhi Car Blast 2025 Live Updates : रिक्षा ड्रायव्हरनं सांगितली आपबिती; स्फोटावेळी नेमकं काय घडलं?

आयईडी स्फोटकंही जप्त

पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूंमध्ये ३६० किलो अमोनियम नायट्रेट आणि इतर २५०० किलो ज्वलनशील पदार्थाचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर शेकडो आईडी डिव्हाईस देखील यामध्ये जप्त करण्यात आहेत. त्यामुळं या साहित्यांचा वापर करुन दिल्लीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचं कटकारस्थान सुरु असल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Delhi Blast
Sameer Bhujbal : समीर भुजबळांची खेळी, भाजपला सोबत घेऊन सुहास कांदेंना एकटं पाडणार

सकाळी जप्त केलेल्या स्फोटकांप्रकरणी डॉ. मुझामिल शकील नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यक्ती हरयाणातील एका मेडिकल कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करत असल्याचं कळतं आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याजवळून पोलिसांनी हे सर्व स्फोटकांचं साहित्य जप्त केलं आहे. त्याचबरोबर याच रुग्णालयात काम करणारी आणि डॉ. शकीलची सहकारी महिला डॉक्टरला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com