Sameer Bhujbal : समीर भुजबळांची खेळी, भाजपला सोबत घेऊन सुहास कांदेंना एकटं पाडणार

Sameer Bhujbal Vs Suhas Kande : विधानसभेला समीर भुजबळ व सुहास कांदे यांच्यात मोठा राडा झाला होता. आता नगरपालिका निवडणुकीतही दोघांमधील संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहे.
Sameer Bhujbal, Chhagan Bhujbal
Sameer Bhujbal, Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : येवल्यासह नांदगाव व मनमाड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना(शिंदे गटाला) बाजूला ठेऊन भाजप व राष्ट्रवादी अशी युती करण्याची माजी खासदार समीर भुजबळ यांची चाल असल्याचे दिसते. त्यादृष्टीने समीर भुजबळांचा खटाटोप सुरु असून त्यांनी आज त्यासाठी भाजप मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.

नांदगाव आणि मनमाड या नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा माजी खासदार समीर भुजबळ व आमदार सुहास कांदे यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत नांदगाव मतदारसंघातून सुहास कांदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हा दोघांमध्ये मोठा वाद झाला होता, अवघ्या महाराष्ट्राने तो पाहिला आहे.

आता नगरपालिका निवडणुकीतही दोघांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. समीर भुजबळ यांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्यासाठी हालचाल सुरु केली असून त्यादृष्टीने संकेत दिले आहेत. नांदगाव व मनमाड मध्ये भाजपला सोबत घेतल्यास सुहास कांदे यांना शह देण्यासाठी समीर भुजबळांना मदत होईल. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे.

Sameer Bhujbal, Chhagan Bhujbal
Nashik Politics : भाजपच्या अटीमुळे येवल्यात प्रॉब्लेम? समीर भुजबळ- गिरीश महाजन यांच्यात बंद दाराआड गुप्तगू..!

छगन भुजबळ हे आजारी आहेत. त्यामुळे समीर भुजबळ यांच्यावर निवडणुकांचा अधिक भार आहे. त्यांनी येवला नगरपालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. येवल्यात त्यांना भाजपला सोबत घ्यायचे आहे. पण भाजपने नगराध्यक्ष पदावर दावा केल्याने मोठी अडचण झाली होती. त्यावर येवला नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहू द्या अशी विनंती त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेऊन केली.

Sameer Bhujbal, Chhagan Bhujbal
Nashik Politics : राज्याचं ठरेना पण नाशिकमध्ये ठरलं ; मविआमध्ये मनसेची एन्ट्री, सर्व निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा

समीर भुजबळांनी महाजन यांच्या भेटीनंतर माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, खासकरुन नांदगाव, मनमाडमधील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की, एकत्र लढले पाहिजे. त्यासंदर्भात दोन्हीकडे काय परिस्थिती आहे, याचा त्याचा आढावा गिरीश महाजन यांना दिला आहे. येवल्यात सुद्धा दोन्ही पक्ष एकत्र झाल्यास चांगले होईल. त्यादृष्टीनेही महाजनांशी चर्चा केली. त्यानुसार तेही त्याच्या काही लोकांशी चर्चा करणार आहेत. उद्या पुन्हा मुंबईमध्ये आम्ही भेटणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com