Kejriwal Boycott Niti Aayog Meeting : आप-केंद्र सरकार वाद पेटला; नीती आयोगाच्या बैठकीवर मुख्यमंत्री केजरीवालांचा बहिष्कार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रही लिहिले आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sarkarnama

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी (ता. २७ मे) होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी दिल्लीत केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (Delhi Chief Minister Arvind Kejriwal's boycott of Niti Aayog meeting)

दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली आणि नियुक्तीचा अधिकार निवडून आलेल्या दिल्ली सरकारचा आहे, तो अधिकार उपराज्यपालांचा नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पोलिस, जमीन आणि पब्लिक ऑर्डर हे तीन विभाग मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीत राहतील. हे तीन विषय वगळता दिल्लीचे उपराज्यपाल राज्य सरकारच्या इतर निर्णयांना बांधिल असतील, असेही न्यायालयाने म्हटले होते. त्याला केंद्र सरकारने अध्यादेश काढून स्थगिती दिली आहे. त्यानंतर आप आणि केंद्र सरकारमधील वाद चांगलाच वाढला आहे.

Arvind Kejriwal
Congress News : कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेस लागली लोकसभेच्या तयारीला; येत्या २ व ३ जूनला मतदारसंघनिहाय बैठका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) एक पत्रही लिहिले आहे. त्यात केजरीवाल यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान जर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाहीत, तर लोकांनी न्यायासाठी कुठे जायचे? पंतप्रधान मोदींनी बिगरभाजप सरकारांना काम करू द्यावे. जर सहकारी संघराज्य हा एक विनोद असेल तर नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यात अर्थ काय? असा सवालही केजरीवाल यांनी केला आहे.

केजरीवाल यांनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे लोकशाहीवर हल्ले होत आहेत. बिगरभाजप सरकारे पाडले जात आहेत, मोडली जात आहेत किंवा त्यांना काम करू दिले जात नाही. ही ना आपल्या भारताचे व्हिजन आहे ना सहकारी संघराज्याचे. गेल्या ८ वर्षांच्या लढ्यानंतर दिल्लीच्या जनतेने सर्वोच्च न्यायालयात लढाई जिंकली. दिल्लीच्या जनतेला न्याय मिळाला. पण, अवघ्या ८ दिवसांतच तुम्ही अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मोडीत काढला.

Arvind Kejriwal
BJP Vs Shinde Group : भाजप-शिंदे गटात वादाची ठिगणी : ‘आम्हाला सन्मान मिळत नाही, सापत्न वागणूक मिळते’; खासदारांचा हल्लाबोल

दिल्ली सरकारचा कोणताही अधिकारी काम करत नसेल, तर जनतेने निवडून दिलेले सरकार त्याच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही. असे सरकार कसे चालेल? हे सरकार पूर्णपणे पंगू बनले आहे. दिल्ली सरकारला आपण पंगू का बनवता आहात? हीच भारताची दृष्टी आहे का, हे सहकारी संघराज्य आहे का? असा सवालही केंजरीवाल यांनी मोदींना विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com