Bharat Gogawle: मर्द असतील तर चमत्कार दाखवा; गोगावलेचं राऊतांना खुलं आव्हान

Maharashtra Politics: हिंदुत्वाच्या विचारावर जर दोन मराठी नेते एकत्र येणार असतील, तर ते आवडेल..
Sanjay raut, Bharat Gogawle
Sanjay raut, Bharat GogawleSarkarnama

Kolhapur: खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नामर्द अशी टीका केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. कोल्हापुरात श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या गोगावले यांनी राऊत यांना प्रत्युत्तर देत खासदार राऊत मर्द असतील तर त्यांनी एकदा तरी चमत्कार करून दाखवावा, असे खडेबोल राऊत यांना सुनावले आहेत.

नववर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन मंत्रिपद मिळेल असं वाटत आहे, गेल्या अनेक दिवसांपासून आमदार भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाची चर्चा राज्यभर सुरू आहे. यासाठी त्यांनी राज्यभरातील अनेक मंदिरात जाऊन प्रार्थनाही केली आहे, आज कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात केली.

सिंधुदुर्गातील पाणबुडीचा प्रकल्पवरून बोलताना, कोणताही प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राज्यातील जनतेला अश्वस्त केले आहे. त्यामुळे कोणताही प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, असा विश्वास यावी आमदार गोगावलेंनीं व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली आहे. हिंदुत्वाच्या विचारावर जर दोन मराठी नेते एकत्र येणार असतील, तर ते आवडेल. मात्र पाच जानेवारीला रायगड जिल्ह्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या काय चर्चा झाली? याबाबत मी त्यांना विचारणार आहे. जर हिंदूंच्या विचारावर दोन मराठी नेते एकत्र येऊन असतील तर ते आपल्याला आवडेल, असा आशावाद यावेळी आमदार गोगावले यांनी व्यक्त केला.

Sanjay raut, Bharat Gogawle
DSP Dalbir Singh: अर्जुन पुरस्कार विजेते डीएसपी दलबीर सिंह यांची गोळ्या झाडून हत्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com