Arvind Kejriwal : कोर्टातच बिघडली अरविंद केजरीवालांची तब्बेत; तातडीने दुसऱ्या खोलीत हलवलं...

Delhi Liquor Scam Case CBI arrested CM Arvind Kejriwal : सीबीआयने बुधवारी अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टात आणले आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी याआधी ईडीने त्यांना अटक केली होती. मंगळवारी सीबीआयने तिहार जेलमधून केजरीवालांना ताब्यात घेतल्यानंतर आज राऊज अव्हेन्यू कोर्टात आणले.

कोर्टात केजरीवालांची तब्बेत अचानक बिघडली आहे. त्यांची रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तातडीने कोर्टातून बाहेर आणत दुसऱ्या कोलीत आणण्यात आले. त्यांना तिथे चहा-बिस्कीट दिल्याचे समजते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. यावेळी केजरीवालांच्या पत्नी सुनिता केजरीवालही या खोलीत उपस्थित होत्या.

Arvind Kejriwal
Rahul Gandhi in Lok Sabha : है तैयार हम! राहुल गांधींनी लोकसभेतील पहिल्याच भाषणात भरला दम

दरम्यान, ईडीने केजरीवालांना 21 मार्चला अटक केले होते. त्यानंतर त्यांच्या नियमित जामीनावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. त्याआधीच सीबीआयने केजरीवालांना तिहार जेलमधून ताब्यात घेतले. आज त्यांना कोर्टात आणत त्यांची कस्टडी मागितली.

सिसोदियांनी आणले धोरण

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्या तिहार जेलमध्ये असलेल्या मनिष सिसोदिया यांनी मद्य धोरण आणल्याचे केजरीवालांनी सांगितल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ज्या कॅबिनेटने मद्य धोरणाला परवानगी दिली, त्या कॅबिनेटचा केजरीवाल भाग होते. लाच घेतल्यानंतर धोरणामध्ये संबंधितांचे हित लक्षात घेऊन बदल करण्यात आले.

Arvind Kejriwal
Lok Sabha Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड

केजरीवालांचे वकील विक्रम चौधरी यांनी सीबीआयच्या दाव्याचा विरोध केला. सीबीआयने केजरीवालांना ताब्यात घेणे म्हणजे संविधानातील तरतुदींचे उल्लंघन आहे. त्यांच्या अटकेची माहिती आम्हाला मीडियातून मिळाली, असा दावा वकिलांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com