Rekha Gupta Clarification : दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयातून 'ते' फोटो हटवल्याबाबत खुद्द मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीच दिले स्पष्टीकरण, म्हणाल्या...

Delhi CM Office News : आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंह यांचा अपमान म्हटले आहे आणि आरोप केला आहे की...
Delhi Politics
Delhi PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Delhi CM Office Ambedkar and Bhagat Singh Photo Controversy : दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कार्यभार स्वीकारताच त्यांच्या कार्यालयात झालेला एक बदल चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कक्षातील भिंतीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंह यांचे फोटो हटवले गेले. ही बाब समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. अखेर यावर आता खुद्द मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता(Rekha Gupta) यांनी सांगितले की, इथे सरकारचे प्रमुख, देशाचे राष्ट्रपती आणि राष्ट्रपती महात्मा गांधी यांचा फोटो लागला नाही पाहीजे का? तसेच त्यांनी पुढे म्हटले की, शहीद भगतसिंह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाचे प्रणेते आहेत, ते पूजनीय, आदरणीय आणि मार्गदर्शक आहेत.

Delhi Politics
Rupali Thombre Offer Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर? ; रूपाली ठोंबरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत!

या बदलावरून विरोधकांनी भाजपवर(BJP) टीका सुरू केली आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंह यांचा अपमान म्हटले आहे आणि आरोप केला आहे की, भाजप सरकार इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हायरल फोटोत दिसत आहे की, आता मुख्यमंत्री कार्यालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी(PM Modi) यांचे फोटो लागले आहेत. तर आधीच्या फोटोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंह यांचे फोटो दिसून येत आहेत.

Delhi Politics
Kash Patel FBI India Connection : अमेरिकन गुप्तचर संस्था 'FBI'च्या प्रमुखपदाची जबाबदारी मिळालेले काश पटेल यांचे 'INDIA' कनेक्शन!

या मुद्य्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक यास एक सामान्य बदल मानत आहेत, तर काहीजण इतिहासाशी छेडछाड म्हणत आहेत.यावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिले आहे, परंतु हा वाद थांबताना दिसत नाही. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की आगामी काळात सरकार याबाबत काय पावलं उचलते आणि विरोधक हा राजकीय मुद्दा बनवतात की नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com