
Rekha Gupta: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर दोन दिवसांपूर्वी त्यांच्याच सरकारी बंगल्यातील जनता दरबारच्या कार्यक्रमात एका तरुणानं हल्ला केला होता. या तरुणानं मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावून केस ओढल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. यानंतर रेखा गुप्ता यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारनं वाढ केली आहे. त्यांना आता सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा लागू करण्यात आली आहे. यानंतरही गुप्ता यांच्यावर आज पुन्हा दुसऱ्या एका कार्यक्रमात अशाच गोंधळाच्या प्रसंगाला समारं जावं लागलं आहे.
दिल्लीतील अशोक बाजार गांधी नगरमध्ये मुख्यमंत्री रेखा गुप्ता रेडिमेड गारमेंट्स डीलर्स असोसिएशनद्वारे आयोजित 'वस्त्रिका २०२५' या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात एका व्यक्तीनं अचानक घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळं कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाच वातावरण निर्माण झालं. पण खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेडिंगच्या बाहेरच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल. या व्यक्तीची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. तसंच दुसऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हा व्यक्ती देखील गोंधळ घालण्याच्या तयारीत होता.
जनता दरबारच्या कार्यक्रमात मुख्यंमत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच या सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. म्हणजेच सलग दुसऱ्या कार्यक्रमात गोंधळ झाल्यानं प्रशासन देखील अलर्ट झालं आहे. या कार्यक्रमाला स्थानिक खासदार हर्ष मल्होत्रा, स्थानिक आमदार अरविंद सिंह लवली, नगरसेवक आणि गांधीनगर मार्केटचे व्यापारी यावेळी हजर होते. काही काळ गोंधळ निर्माण झाला असला तरी यामुळं मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर काहीही परिणाम झाला नाही तो सुरळीत पार पडल्याचं सांगण्यात आलं.
दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी एका कार्यक्रमात हल्ला झाला होता. दिल्लीच्या सीएम हाऊसमध्ये ही घटना घडली. मुख्यमंत्री लोकांची प्रश्न ऐकून घेत असताना एका ४० वर्षीय व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला केला. मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावत याव्यक्तीनं त्यांचे केसही ओढले. त्यानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ माजला. गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील राजेश खिमजी नामक तरुणानं मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला होता. हल्ल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी कोर्टानं सुनावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.