Arvinder Singh Lovely : लोकसभेच्या रणधुमाळीत दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली भाजपमध्ये दाखल!

BJP Vs Congress : जाणून घ्या भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अरविंदर सिंग लवली यांनी काय दिली प्रतिक्रिया?
Arvinder Singh Lovely
Arvinder Singh LovelySarkarnama

Delhi BJP News : दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंह लवली यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत नसीब सिंह, नीरज बसोय आणि राजकुमार चौहान यांनीही भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. ते भाजपामध्ये दुसऱ्यांदा सहभागी झाले.

याआधीही ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीयमंत्री हरदीप सिंह पुरी, दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा सुद्धा उपस्थित होते.

याप्रसंगी भाजपाचे नेते विनोद तावडे(Vinod Tawade) म्हणाले, राहुल गांधींनी रायबरेलीमधून उमेदवारी दाखल केली आहे. मात्र काँग्रेसच्या लोकांना प्रियंका गांधी हव्या होत्या, मात्र राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचा नारा आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ. काँग्रेसचा नारा आहे बेटा बचाओ बेटा बढाओ.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Arvinder Singh Lovely
Raebareli Loksabha News: 'रायबरेली' गांधी घराण्याचा बालेकिल्ला, आई-आजी निवडून आल्या; पण राहुल गांधींचं काय होणार?

दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, मी अगोदरच म्हटले होते की जो पण व्यक्ती दिल्लीवर प्रेम करतो, तो दिल्लीला लुटणाऱ्यांसोबत उभा राहू शकत नाही. परंतु अनेकजण आहेत ज्यांना असं वाटतं की देशाल सशक्त सरकार मिळावं. देशाच्या विकासात पंतप्रधानाचे हात बळकट करू इच्छितात.

तर हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, आज माझ्यासाठी विशेष दिवस आहे. मी दिल्लीचाच आहे. दिल्लीत जेव्हा विकास कामं झाली, तेव्हा राजकुमार चौहान आणि लवली मंत्री होते. देश आणि दिल्लीत हे सर्व लोक विकास कार्यास पुढे नेतील. या सर्वांचा वापर केला जाईल, सर्वांना शुभेच्छा.

Arvinder Singh Lovely
Loksabha Election 2024 : फिरोज गांधींपासून सुरु झालेली रायबरेलीच्या विजयाची कौटुंबिक परंपरा राहुल जपणार?

काय म्हणाले अरविंदर सिंग लवली? -

अरविंदर सिंग लवली(Arvinder Singh Lovely) यांनी म्हटले की, मोदी, नड्डा आणि अमित शाह यांचे आभार मानतो. जेव्हा आम्ही हरवल्यासारखे भटकत होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला संधी दिली. आम्ही आज पाच वरिष्ठ लोक आलो आहोत, मात्र असे अनेकजण आहेत ज्यांची अशी इच्छा आहे की देशाला एक सशक्त सरकार मिळावं. देशाच्या विकासात पंतप्रधानांचे हात बळकट करू इच्छित आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com