Ajit Pawar: फडणवीस मैत्रीपूर्ण लढत म्हणताच अजितदादांची दोस्तीत कुस्ती; भाजप-शिवसेनेला दिला धक्का

Pune Politics Shiv Sena and BJP leaders have joined Ajit Pawar NCP: पुणे आणि पिंपरी चिंचवड हा बालेकिल्ला राखण्यासाठी अजित पवारांनी पूर्ण ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांनी आता भाजपसह शिवसेनेला देखील धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत घेणार नाही असं स्पष्ट केलं. याबाबत बोलताना अजित पवार यांनी आपल्याला मुख्यमंत्री काय बोलले याची कल्पना नाही. मात्र ते बोलले असतील तर विचारपूर्वकच बोलले असतील असं सांगितलं. भाजपने आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्णयावर अजित पवार हे तितकेसे सकारात्मक असल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही.

मात्र भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजित पवारांनी देखील बैठकींचा सपाटा सुरू केला आहे. आचारसंहिता जाहीर होतात त्यांनी पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेतल्या त्यानंतर आज सकाळपासून देखील बैठकांचे सत्र सुरूच आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे हा बालेकिल्ला राखण्यासाठी अजित पवारांनी पूर्ण ताकद लावण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि याचाच भाग म्हणून अजित पवारांनी आता भाजपसह शिवसेनेला देखील धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

आज सकाळी पिंपरी चिंचवड मधील भाजप नगरसेवकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव, शिवसेना ठाकरे गटांच्या शहर प्रमुख रूपाली आल्हाट, शिवसेना उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आहे.

Ajit Pawar News
सांगलीत मध्यरात्री राजकीय उलथापालथ : 15 माजी नगरसेवक अजितदादांना भेटले; शरद पवार, काँग्रेस, भाजपला मोठा धक्का

भाजपचे अनेक माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असून पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सीमा सावळे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्या आज सकाळी अजित पवार यांच्या भेटीला आल्या असून या भेटी आणि बैठकीनंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com