
दिल्ली काबीज करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दिल्ली निवडणूक कशी जिंकायची यासाठी सर्व पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. त्यात 27 वर्षांचा वनवास संपवण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. आम आदमी पक्ष विजयाच्या हॅट्रिकसाठी उत्सुक आहे. त्याच वेळी, काँग्रेसलाही आपला वनवास संपवायचा आहे.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची यावेळेसची लढत त्रिकोणी होण्याची शक्यता आहे. लोकसभेला इंडिया आघाडीत एकत्र लढणाऱ्या आप आणि काँग्रेसने दिल्ली विधानसभेत मात्र, स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने जवळजवळ सर्व जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
तसेच भाजपने आतापर्यंत फक्त 29 जागांचीच उमेदवार यादी जाहीर केली आहे. उर्वरित 41 जागांसाठी भाजपमध्ये (BJP) अजूनही विचारविनिमय सुरू आहे. याबाबत शुक्रवारी संध्याकाळी उशिरा भाजप मुख्यालयात भाजप केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक पार पडली.
खरंतर, 2025 ची दिल्ली विधानसभा निवडणूक (Delhi Vidhan Sabha Election) यावेळी भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. भाजप गेल्या 27 वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेपासून दूर आहे. भाजपला हरियाणा आणि महाराष्ट्रातील विजयाची गती दिल्लीतही कायम ठेवायची आहे. हेच कारण आहे की पंतप्रधान मोदीं यांनी स्वतः भाजपच्या वतीने दिल्ली निवडणुकीची जबाबदारी घेतली आहे.
दिल्ली निवडणुकीसाठी उमेदवारांच्या दुसऱ्या यादीवर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा स्वतः लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या उमेदवार यादीवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि बीएल संतोष यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते.
या बैठकीत दिल्लीतील उर्वरित जागांसाठी उमेदवारांबाबत चर्चा झाली. भाजपची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर होऊ शकते असे मानले जात आहे. बैठकीत उमेदवारांची दुसरी यादी अंतिम करण्यासाठी भाजप नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी दिल्लीतील उमेदवार यादी आणि आम आदमी पक्षाला आव्हान देण्यासाठी रणनीती काय असेल हे या बैठकीतच ठरवण्यात आले.
पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा मंत्र. पंतप्रधान मोदींनी बैठकीत सांगितले की, दिल्लीतील लोकांचा भाजपकडे कल वाढला आहे. पण निवडणुका जिंकण्यासाठी आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागेल. आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे वास्तव जनतेसमोर आणले पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.