
Delhi News: दिल्ली विधानसभेसाठी उद्या (बुधवारी) मतदान होत आहे. काल (सोमवारी) प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. पण दिल्लीच सोमवारी रात्री भाजप आणि आप यांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. यात दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी व भाजपचे नेते रमेश बिधूडी यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपच्या मुख्यमंत्रीआतिशी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आतिशी आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतिशी यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आतिशी या निवडणूक लढत आहेत.निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी आतिशी यांच्यावर केला आहे. दिल्ली पोलिसांनी आतिशींच्या समर्थकांविरुद्ध देखील दुसरा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
सोशल मीडियावर आतिशी मार्लेना यांनी पोस्ट करुन दिल्ली पोलीस व निवडणूक आयोगाविरोधात आवाज उठवला आहे. निवडणूक आयोगही अजब आहे! रमेश बिधुरीजींच्या कुटुंबातील सदस्य उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मी पोलिसांकडे तक्रार केली आणि मी त्यांना फोन केला आणि त्यांनी माझ्याविरुद्ध खटला दाखल केला! राजीव कुमार जी: तुम्ही निवडणूक प्रक्रिया किती खराब कराल? असा सवाल आतिशी यांनी उपस्थित केला आहे.डीसीपी दक्षिण पूर्व दिल्लीच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन आप नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
गोविंदपुरी पोलिसांनी मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आतिशींवर करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी आतिशींच्या समर्थकांविरुद्ध देखील दुसरा गुन्हा दाखल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.