
Pune News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये अडीच लाखांहून अधिक उत्पन्न आणि चारचाकी वाहन असणाऱ्या बहिणींना योजनेच्या लाभास अपात्र ठरविण्यात आले आहे. तथापि, पुणे जिल्ह्यात पडताळणी आधी फक्त पाच लाडक्या बहिणींनी लाभ परत करून मिळालेली रक्कम महिला व बाल कल्याण विभागाकडे परत केली आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणतीही फारशी शहानिशा न करता राज्य सरकारने बहुतांश महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला. मात्र, आता निवडणुकीनंतर अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना दरमहा १५०० दिले जात आहेत, आता सरकारने अनुदान वाढीचा निर्णय घेतला जाणार असल्याने लाभ घेणाऱ्या अनेक लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आली आहे.
कारवाई करण्याच्या आधी सरकारने निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना स्वतःहून योजनेतून माघार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी पुणे जिल्ह्यातून पाच बहिणी पुढे आल्या. माझ्याकडून नजरचुकीने हा अर्ज माझाकडून करण्यात आला, मला आता या योजनेचा लाभ नको आहे, अशी कारणे देऊन लाडकी बहिणी योजनेचा लाभ नाकारत आहेत.
महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. बैठकीत जिल्ह्यातील लाभार्थ्यांपैकी निकषात न बसलेल्या महिलांना लाभ सोडण्याचे आवाहन करण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानंतर पहिल्याच दिवशी एक महिला ही जिल्हा परिषदेची सेवानिवृत्त कर्मचारी आहे. या महिलेने सरकारने आवाहन केल्यानंतर आपल्याला 'आता या लाभाची गरज नाही,' असे लेखी देऊन योजनेतून माघार घेतली. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत अवघ्या चार महिलांनी लाभ सोडला. जिल्ह्यामध्ये सुमारे वीस लाख लाडक्या बहिणी असून अपात्रेच्या मुद्द्यावर त्यापैकी अवघ्या पाचच महिला पुढे आल्यामुळे नक्की संख्या किती आहे किंवा कसे याबद्दल स्पष्टता आलेली नाही.
अपात्र असूनही लाडक्या बहिणीने लाभ घेतला आणि तो पुन्हा परत केला, म्हणून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यामध्ये चारचाकी गाडी तसेच अन्य निकषांमध्ये अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या मोठी असल्याची चर्चा आहे. परंतु, प्रत्यक्षात लाभ परत करण्यासंदर्भात पुढे येणाऱ्या लाडक्या बहिणींचे प्रमाण अत्यल्प असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.