
सत्तेत येण्यासाठी महायुतीला फायदेशीर ठरलेली 'लाडका भाऊ'एकनाथ शिंदे आणि 'देवाभाऊ'देवेंद्र फडणवीस यांची 'लाडकी बहीण' सध्या नाराज असल्याचे चित्र आहे, कारण आणखी काही लाडक्या बहिणींना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. योजनेबाबत नवीन निकष आल्यामुळे अनेक बहिणींना योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. योजनेच्या लाभार्थ्यांकडे जर चारचाकी असेल तर त्या अपात्र ठरणार आहेत.त्यांच्या घरी चारचाकी आहे की नाही याची तपासणी होणार आहे. अंगणवाडी सेविका या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींच्या घरी जाणार असून पडताळणी करणार आहेत. महिला व बालविकास विभागाने याबाबत आदेश दिले आहेत.
महिलांच्या कुटुंबाच्या नावावर कोणतीही चारचाकी वाहन नाही ना याची पडताळणी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका आजपासून सुरु करणार आहेत. चारचाकी वाहन असणाऱ्यांची यादी परिवहन विभागाकडून मागवण्यात आली आहे. त्याआधारे लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. नव्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा.
कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास अपात्र ठरेल.
महिलेचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.