Pakistan News : पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटला ; 'POK'मधील अत्याचाराचा 'UNHRC'मध्ये झाला 'पर्दाफाश'

Pakistan and POK News : पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा अनेकदा जगासमोर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर फाटलेला आहे.
Pakistan PM
Pakistan PMSarkarnama
Published on
Updated on

UNHRC and Pakistan News : पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा अनेकदा जगासमोर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर फाटलेला आहे. शिवाय, तेथील कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे निघाल्याचेही अनेक घटनांमधून वारंवार दिसून येत असते. सध्या कर्जबाजारी आणि कंगाल असलेल्या पाकिस्तानच्या कुरापती मात्र सुरूच असतात. आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडून POKमध्ये सुरू असलेला अत्याचाराचा पर्दाफाश झाला आहे.

बडगामचे काश्मीरी कार्यकर्ता जावेद बेग यांनी जिनेव्हामध्ये UNHRCच्या 57व्या सत्रात गिलगित बाल्टिस्तानच्या लोकांवरील पाकिस्तानचा(Pakistan) अत्याचार उघडकीस आणला आहे. मागील सात दशकांत हे पहिल्यांदाच होतं की, गिलगित बाल्टिस्तानच्या लोकांच्या दुर्दशेचा मुद्दा काश्मीरच्या एखाद्या भारतीय कार्यकर्त्याने संयुक्त राष्ट्राच्या मंचावर उपस्थित केला. गिलगित बाल्टिस्तान पाक अधिकृत काश्मीरचा भाग आहे.

Pakistan PM
Shashi Tharoor : 'वर्कलोड'मुळे कर्मचारीचा मृत्यू? ; शशी थरूर संसदेत मुद्दा मांडणार, म्हणाले...

जावेद बेग यांनी जिनेव्हामध्ये म्हटले की, गिलगित-बाल्टिस्तान या POGBमध्यील नागरिकांची दुर्दशा अतिशय दुखावणारी आहे. हे क्षेत्र गंभीर मानवाधिकाराचे उल्लंघन, पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून पद्धतीशीर शोषण आणि तीव्र दडपशाहीने पीडित आहे. येथे पाकिस्तानचे एकमेव शिया आणि इस्माइली बहुल प्रशासकीय क्षेत्र आहे. स्थानिक लोकांना भेदभाव आणि उपेक्षाला सामोरे जावे लागते. अपहरण, न्यायबाह्य हत्या आणि मनमनी पद्धतीने ताब्यात घेण्यात आल्याच्या अनेक रिपोर्ट आढळल्या आहेत.

Pakistan PM
Kumari Selja: हरियाणात 'खेला' होणार! ; काँग्रेसच्या कुमारी शैलजा भाजपमध्ये प्रवेश करणार?

त्यांनी UNHRCच्या 57व्या सत्रात पुढे सांगितले की, POGB मध्ये अन्यायकारक कर आकारणी आणि संसाधनांच्या शोषणांविरुद्धच्या निषेधांमध्ये अलीकडील वाढ, सुरक्षा दलांकडून क्रूर दडपशाहीला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानी राजवटीची प्रतिक्रिया म्हणजे असंतोषाला दडपून टाकणे, कार्यकर्त्यांना गप्प करणे आणि मूलभूत स्वातंत्र्य कमी करणे, जे मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा त्रासदायक नमूना अधोरेखित करते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com