

New Dehli : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये सोमवारी सायंकाळी 6.45 वाजता मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर तीन गाडयांना आग लागली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस यंत्रणेकडून स्फोटाचे नेमके कारण शोधले जात आहे. या स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.
लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर एकच्या बाहेर पार्किंगमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटानंतर गाडीला भीषण आग लागली. हा स्फोट घडताच अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नुकसान झाले आहे.
या गाडीत स्फोट झाल्यानंतर परिसरात मोठा आवाज आला. अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. परिसरातील दुकानांची काचे फुटली. हा परिसर अत्यंत रहदारीचा परिसर आहे. याठिकाणी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची यावेळी गर्दी असते. गर्दीच्या वेळी हा स्फोट झाल्याने हा दहशतवादी कट होता का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्मिशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेनंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस (Police) आणि सुरक्षा यंत्रणांकडून सर्व परिस्थिती हातळण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
या स्फोटात गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झालेला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडून संबंधित परिसर खाली करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.
मेट्रो स्टेशन परिसरातील या स्फोटात पार्किंगमधील गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या स्फोटानंतर घटनास्थळी काही गाड्यांचा केवळ सांगाडा दिसत आहे. ही घटना खूप भीषण आहे. या घटनेत जखमी झालेल्याना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आग विझवल्यानंतर परिसरातील भयानक वास्तव समोर येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.