BJP independent contest : नागपूर जिल्ह्यात महायुती तुटली; भाजपचा 'एकला चलोचा नारा', बालेकिल्ल्यात मित्रपक्षांना दाखवला 'कात्रजचा घाट'

BJP to Contest Independently in Nagpur Chandrashekhar Bawankule : भाजपचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले.
BJP independent
BJP independentSarkarnama
Published on
Updated on

Nagpur political updates : नगरपालिका आणि नगर पंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दोन महिन्यात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्या कशा लढायच्या याचा पेच अद्यापही कायम आहे. कधी स्थानिक नेत्यांना अधिकार दिले आहे तर कधी जिथे फायदा तिथे महायुती करू असे सांगून थेट भूमिका भाजपने जाहीर केली नव्हती.

आज मात्र माध्यमांसोबत बोलताना भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले. कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुती एकत्र लढणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढाले त्यामुळे स्थानिक निवडणुकाही महायुती (Mahayuti) एकत्रच लढणार असल्याचे सुरुवातील भाजपने जाहीर केले होते. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना याचे अधिकार दिले आहे, त्यात वरिष्ठ नेते हस्तक्षेप करणार नाही, अशी असेही भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वच ठिकाणी युती होणार नाही, जिथे महायुतीचा फायदा होईल आणि महाविकास आघाडीला फायदा होणार नाही अशा ठिकाणी परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

BJP independent
BJP complaint Eknath Shinde : बच्चू कडूंवर भाजप आमदार भडकले; एकनाथ शिंदे तंबी देणार?

वेगवेगळ्या भूमिकांमुळे महायुतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती आणि जागावाटपाची बोलणीसाठी भाजपने पुढाकार घेतला नाही. आजपासून नगर पालिकाला, पंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात देखील झाली.

BJP independent
Sharad Pawar NCP meeting : पवारांचा 81 वर्षांचा शिलेदार म्हणतो, 'भाजपचा 'बाऊ' नको'; फक्त दोन तास द्या, 'स्थानिक'मध्ये विजय आपलाच!

या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बाबनकुळे यांनी माध्यमांसोबत बोलताना भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला स्वबळावर लढायचे असल्याने तयारीला लागण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या नेत्यांसोबत भेट घेतली. दोघांनी समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचे ठरवले आहे.

भाजप नेत्यांकडून महायुतीबाबत प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. दुसरीकडे काँग्रेसतर्फेसुद्धा नागपूर ग्रामीणमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेसोबत आघाडीचे बोलणी टाळत आहे. हे बघता आता स्थानिकमध्ये सर्वांनाच स्वबळावर लढावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com