Yashwant Verma News : घरात नोटांचा ढीग सापडलेल्या न्यायाधीशांवरील कारवाईला केंद्राची मंजुरी; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

Supreme Court update Modi Government : कॉलेजियमच्या शिफारशीला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिल्याने न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या अलाहाबाद हायकोर्टातील बदलीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
Yashwant Verma, Supreme Court
Yashwant Verma, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविषयी मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या घरात काही दिवसांपूर्वी नोटांचे ढीग आढळून आले होते. तसेच घराच्या परिसरात जळालेल्या नोटाही सापडल्या होत्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने तातडीने वर्मा यांच्याबाबत तडकाफडकी निर्णय घेत त्यांच्या बदलीचा निर्णय घेतला होता. या बदलीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

कॉलेजियमच्या शिफारशीला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिल्याने न्यायाधीश वर्मा यांच्या अलाहाबाद हायकोर्टातील बदलीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्ली हायकोर्टाआधी ते अलाहाबादमध्ये कार्यरत होते. त्यांना पुन्हा त्याचजागी पाठवण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या बदलीला अलाहाबाद हायकोर्टातील वकिलांनी विरोध केला होता. त्याविरोधात त्यांच्याकडून आंदोलनही करण्यात आले होते. 

Yashwant Verma, Supreme Court
Fodder Scam: तीस वर्षांपूर्वीचं प्रकरण उकरुन काढलं! माजी मुख्यमंत्र्यासह आरोपींकडून 950 कोटी वसुल करणार

केंद्र सरकारने वर्मा यांच्या बदलीला मंजुरी दिल्याने आता ते कार्यभार स्वीकारतील. त्याचप्रमाणे वर्मा यांच्या सोबत दिल्ली हायकोर्टातील आणकी एक न्यायाधीश चंद्रधारी सिंह यांचीही बदली अलाहाबाद हायकोर्टात कऱण्यात आली आहे. वर्मा यांच्या घरामध्ये मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याचे समोर आले होते.

वर्मा यांच्या घरामध्ये 14 मार्चला आग लागली होती. आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना स्टोअर रुममध्ये नोटांचे ढीग आढळून आले होते. त्यातील बऱ्याच नोटा जळाल्या होत्या. सुप्रीम कोर्टाकडून याबाबतचा व्हिडीओ प्रसिध्द करण्यात आला होता. त्यानंतर सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी 22 मार्चला याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांच्या समितीमार्फत अंतर्गत तपास सुरू केला.

Yashwant Verma, Supreme Court
Kunal Kamra update : कुणाल कामराला हायकोर्टाचा दिलासा; पोलिसांना दिले महत्वाचे आदेश, महाराष्ट्रात येणार

दरम्यान, वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना द्यावेत, या मागणीची याचिका आज सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली. न्यायाधीश अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळली. या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सरन्यायाधीशांनी सुरू केली आहे. समितीचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील प्रक्रियेनुसार कार्यवाही होईल. पुढे खूप पर्याय आहेत. त्यामुळे सध्या त्यात दखल देण्याची गरज नाही, असे कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com