Shraddha Walkar Case : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय; म्हणाले, "वृत्तवाहिन्यांनी अंतिम निकाल लागेपर्यंत..."

Delhi Police : दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या सहा पानांच्या आरोपपत्राबाबत
Shraddha Walkar Murder Case
Shraddha Walkar Murder CaseSarkarnama

Delhi High Court on Shraddha Walkar Murder Case : देशभरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची बरीच चर्चा झाली. श्रद्धा वालकरचा प्रियकर असणारा आफताब पुनावाला याने आधी गळा दाबून तिचा खून केला. यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. या घटनेच्या खुलाशानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.

Shraddha Walkar Murder Case
Sanjay Rathod News : हजारोंसाठी दखलपात्र ठरली संजय राठोड यांची असंवेदनशीलता !

या हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi News) जानेवारी २०२३ च्या अखेरीस सुमारे सहा हजार पानाचे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात १०० लोकांचे स्टेटमेंट आहेत. तसेच, यामध्ये पुरावे म्हणून इलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक विभागाकडून प्राप्त झालेले अहवाल देण्यात आले आहेत. आरोपपत्रामध्ये पोलिसांनी आफताबचा कबूलनामा दिला आहे. आफताबचा नार्को टेस्टच्या फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल जोडण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात चार्जशीट सादर केले.

Shraddha Walkar Murder Case
Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटील हे १६ तासांचा ‘शिरूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार

दरम्यान, आज बुधवारी (ता. २० एप्रिल) श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी (Shraddha Walkar) उच्च न्यायालयाने माध्यमांबाबत एक मोठा निर्णय दिलेला आहे. न्‍यायमूर्ती रजनीश भटनागर (Delhi Court) यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी या प्रकरणी दाखल आरोपपत्रातील मजकूर दाखवण्‍यास किंवा त्‍याची माहिती देण्‍यास सर्व वृत्तवाहिन्‍यांना न्‍यायालयाने मनाई केली आहे. श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत सर्व वृत्तवाहिनींनी या प्रकरणी दाखल आरोपपत्रातील मजकूर प्रदर्शित करु नये किंवा दाखवू नये, असे निर्देश न्‍यायमूर्ती रजनीश भटनागर यांनी केंद्र सरकारला दिले आहेत.

Shraddha Walkar Murder Case
Chhagan Bhujbal Panel In Yeola: शिवसेनेला सोबत घेत भुजबळांचे पॅनल जाहीर!

आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे दोघे लिव्ह-इन मध्ये होते. ते दोघे दिल्लीतील (Delhi) मेहरौली भागात राहत होते. दरम्यान, गेल्या वर्षी १८ मे रोजी आफताब पुनावालाने श्रद्धाची हत्या केली होती. हत्येनंतर त्याने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये तीन आठवडे ठेवले होते. ते तुकडे त्याने दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फेकून दिल्याची कबुली दिलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २४ जानेवारी रोजी सहा हजार ६२९ पानांचे आरोपपत्र दाखल केलेले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com