Arvind Kejriwal News : नायब राज्यपालांचा केजरीवालांवर बॉम्ब; ईडी, सीबीआयनंतर आता 'टेरर फंडिंग'बाबत NIA चौकशीचा ससेमिरा

NIA Enquiry : बंदी घालण्यात आलेल्या संघटनेकडून आपला फंडिंग झाल्याचा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी नायब राज्यपालांनी गृह विभागाकडे केली आहे.
Arvind Kejriwal, VK Saxena
Arvind Kejriwal, VK SaxenaSarkarnama

New Delhi News : तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ईडीने केजरीवालांना अटक केली आहे. त्यानंतर आता त्यांच्यामागे राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. दिल्लीचे राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी गृह मंत्रालयाकडे केजरीवालांची एनआयए चौकशी करण्याची शिफारस केली आहे. बंदी घालण्यात आलेल्या संघटनेकडून आपला फंडिंग झाल्याची तक्रार आपल्याकडे आल्याचे सक्सेना यांनी म्हटले आहे.

कथित मद्य धोरण घोटाळा ( Delhi Liquor Policy Scam) प्रकरणी केजरीवाल मागील दीड महिन्यापासून तुरूंगात आहेत. मात्र, अद्याप त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. भाजपसह (BJP) सक्सेना यांच्याकडून केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जाते. तर दुसरीकडे केजरीवाल जेलमधूनच राज्याचा कारभार हाकणार असल्याचे आप नेत्यांकडून सातत्याने सांगितले जात आहे.

Arvind Kejriwal, VK Saxena
Radhika Kheda News : खोली बंद करून माझ्यासोबत गैरवर्तन..! राधिका खेडा यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप

आता केजरीवाल आणखी एका तपास यंत्रणेच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे. ‘शीख्स फॉर जस्टीस’ (Sikhs for Justice) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेकडून केजरीवालांना राजकीय फंडिंग झाल्याचा आरोप केजरीवालांवर करण्यात आला आहे. याबाबत सक्सेना यांच्याकडे एक तक्रार आली आहे. या तक्रारीच्या आधारे सक्सेना यांनी केजरीवालांची एनआयए (NIA) चौकशी करण्याची शिफारस त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला केली आहे. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देवेंद्र पाल भुल्लर यांच्या सुटकेसाठी आपला 16 मिलियन अमेरिकन डॉलर एवढे फंडिंग करण्यात आल्याची तक्रार सक्सेना यांच्याकडे आली आहे. याबाबत तक्रारदाराने दिलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा फॉरेन्सिक तपासासाठी सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे सक्सेना यांनी म्हटले आहे.  

केजरीवालांनी जानेवारी 2014 मध्ये इक्बाल सिंगला लिहिलेल्या पत्राचा संदर्भही सक्सेना यांनी दिला आहे. आप सरकारने आधीच राष्ट्रपतींना भुल्लरला सोडण्याची शिफारस केली आहे, असे या पत्रात लिहिल्याचे म्हटले आहे. इक्बाल सिंग हा जंतरमंतरवर उपोषणाला बसला होता. भुल्लर याच्या सुटकेसाठी लेखी आश्वासन देण्याची मागणी त्याने केली होती.

शीख्स फॉर जस्टीस या संघटनेचा प्रमुख व खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याने काही महिन्यांपुर्वीच एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यामध्ये त्याने आपला 2014 ते 2022 दरम्यान खलिस्तानी ग्रुपकडून 16 मिलियन डॉलर फंडिंग झाल्याचे या व्हिडिओमध्ये म्हटल्याच दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

Arvind Kejriwal, VK Saxena
Farooq Abdullah News : पाकिस्तानने बांगड्या घातलेल्या नाहीत! फारुख अब्दुल्लांच्या विधानावर भाजप भडकले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com