Arvind Kejriwal News : जामिनासाठी केजरीवालांची जेलमध्ये ‘शुगर डिप्लोमसी’; ED ने थेट कोर्टात केला मोठा दावा...

Delhi Liquor Policy Case : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवालांना ईडीने अटक केली आहे. सध्या ते दिल्लीतील तिहार जेलमध्ये आहेत. जामीन मिळावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांना अद्याप कोणत्याही कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी दिल्ली हायकोर्टाने अटकेविरोधातील त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. आता त्यांच्या प्रकृतीवरून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. केजरीवालांची शुगर स्थिर नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

केजरीवाल यांच्या शुगर लेवलची नियमित तपासणी करावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्लीतील (Delhi) राउज एव्हेन्यू कोर्टात करण्यात आली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी केजरीवालांचे वकील म्हणाले, त्यांची शुगर लेवल सतत कमी-अधिक होत आहे. त्यांच्या अटकेआधी ज्या डॉक्टरांकडे तपासणी होत होती, त्यांना आठवड्यातून तीन वेळा केजरीवालांशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Arvind Kejriwal
Lok Sabha Election News : लालूंसमोरच त्यांच्या मुलीच्या पराभवासाठी पक्षातील नेत्याकडून प्रचार; नेमकं काय घडलं?

केजरीवालांच्या या मागणीनंतर ईडीच्या (ED) वतीने कोर्टात मोठा दावा करण्यात आला आहे. ईडीचे वकील जुहैब हुसैन यांनी कोर्टात सांगितले की, केजरीवालांना घरातून जाणीवपूर्वक बटाटा, पुरी, मिठाई आणि इतर गोड पदार्थ दिले जात आहेत, जेणेकरून त्यांची शुगर लेवल वाढेल. वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा, हा त्यामागचा हेतू आहे. याबाबत आम्ही जेल प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे, असे ईडीने म्हटले आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केजरीवालांच्या वकिलांनी ईडीचा हा दावा फेटाळून लावला. वकील विवेक जैन म्हणाले, असे दावे केवळ प्रसारमाध्यमांसाठी केले जात आहेत. केजरीवाल यांची काही खाण्यापूर्वीची शुगर लेवल 243 होती. हे प्रमाण खूप आहे. त्यांना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच जेवण दिले जात आहे.

आम्ही जेलमधून याबाबत अहवाल मागवू, असे कोर्टास केजरीवालांच्या वकिलांना सांगितले. कोर्टाने केजरीवालांचा डाएट चार्टही मागवला आहे. यावर आता पुढील सुनावणी 19 एप्रिलला दुपारी दोन वाजता होणार आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात (Delhi Liquor Scam Case) केजरीवाल हेच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा ईडीने कोर्टात यापूर्वीच केला आहे.

R

Arvind Kejriwal
TMC Manifesto 2024: ममतादीदींच्या टीएमसीचा जाहीरनामा आला; CAA कायद्यासह 'या' 10 घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com