Arvind Kejriwal News : किसने पी, किसने है पिलाई, सब मदहोश है! केजरीवालांच्या अडचणी आणखी वाढणार

Delhi Liquor Scam News : कथित मद्य घोटाळाप्रकरणी केजरीवालांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ते तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा ईडीने कोर्टात केला आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. आज त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर चौकशीदरम्यान केजरीवालांनी दोन मंत्र्यांची नावे घेतल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यानंतर कोर्टाने केजरीवालांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, ईडीच्या या दाव्यानंतर भाजपने विरोधकांकडून जोरदार हल्ला चढवला.

भाजपचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते ड़ॉ. सुधांशू त्रिवेदी, साजिया इल्मी आणि शहजाद पूनावाला यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आप नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्व विरोधी पक्ष ज्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या आरोपीवर कोर्टाच्या दृष्टीने गंभीर आरोप लावण्यात आले आहेत, असे हे नेते म्हणाले.

Arvind Kejriwal
Election Commission News : ईडी, आयटीच्या कारवाया अन् निवडणूक आयोग; चार माजी आयुक्त रोखठोक बोलले

केजरीवालांनी तपासादरम्यान आतिशी आणि सौरभ भारद्वाज या मंत्र्यांची नावे घेतल्याचा दावा ईडीने (ED) केला आहे. त्यावर बोलताना त्रिवेदी म्हणाले, ईडीच्या या खुलाशामध्ये आता हे समजणे कठीण आहे की, कुणी पिली, कुणी पाजली. हे तर सगळ्यांनी ऐकले की मद्य घोटाळा होता. पण ज्याच्याकडे पाहू ते धुंदीत आहेत. असे वाटते सगळ्यांनी मिळून-मिसळून पिली आणि पाजली, अशी टीका त्रिवेदी यांनी केली.

केजरीवाल कोर्टात जाण्यासाठी का घाबरत होते, हे आता समोर आले आहे. पीडित असल्याचा दिखावा करणाऱ्या लोकांना हे समजायला हवे की कोर्टाचा आजचा निर्णय पुराव्यांच्या आधारावर आहे. सर्व विरोधी पक्ष एका भ्रष्ट आणि खोटे बोलणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भावनिक आधार घेतला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ईडीने काय दावा केला?

केजरीवालांना न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने कोर्टात मोठा दावा केला आहे. केजरीवालांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ईडीने केला. तसेच चौकशीदरम्यान त्यांनी सरकारमधील मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwaj) यांचे नाव घेतल्याचेही सांगितले.

ईडीने म्हटले आहे की, ‘विजय नायर हा आपल्याला नव्हे तर आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करत होतो, असे केजरीवालांनी चौकशीदरम्यान सांगितले आहे.‘ ईडीच्या वकिलांकडून कोर्टाला हे सांगितले जात असताना केजरीवालांनी त्याचे खंडन केले आहे. ते गप्प बसून राहिले होते.

अडचणी वाढणार

केजरीवालांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. पुढील 14 दिवस ते या तुरुंगात राहतील. त्यामुळे त्यांना तुरुंगात सरकार चालवणे कठीण जाणार आहे. त्यातच त्यांनी दोन मंत्र्यांची नावे घेतल्याने त्यांचीही चौकशी होऊ शकते. आतिशी आणि भारद्वाज हे केजरीवालांचे अत्यंत विश्वासू मंत्री आहे. तेही ईडीच्या फेऱ्यात अडकल्यास केजरीवाल सरकारसह आपसमोरही मोठे संकट उभे राहू शकते.

R

Arvind Kejriwal
Mahua Moitra News : निवडणूक निकालाआधी महुआ मोईत्रा जेलमध्ये जाणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com