Arvind Kejriwal: केजरीवालांची ईडी चौकशीला पुन्हा दांडी ? विपश्यना शिबिरासाठी रवाना

Delhi Liquor Scam : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. 21 डिसेंबरला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, आजही केजरीवाल हजर राहण्याची शक्यता कमी आहे. अरविंद केजरीवाल हे 10 दिवसांच्या विपश्यना शिबिरासाठी रवाना झाल्याची माहिती आहे.

यापूर्वी केजरीवाल यांना 2 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, तेव्हा पत्र लिहून चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे त्यांनी कळवले होते. त्यानंतर त्यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावत 21 डिसेंबरला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Arvind Kejriwal
Ayodhya Ram Mandir Guest : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सोनिया गांधी-खर्गेंना निमंत्रण; पाहा संपूर्ण यादी!

यानंतरही अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे विपश्यना शिबिरासाठी रवाना झाल्यामुळे आता ते 30 डिसेंबरपर्यंत उपस्थित राहण्याची शक्यता नाही. केजरीवाल यांचे विपश्यना शिबिरात जाण्याचे वेळापत्रक आधीच ठरलेले होते, अशी माहिती आता आम आदमी पार्टीकडून देण्यात येत आहे.

दरम्यान, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात याआधी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांच्यावर कारवाई झाली आहे. यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ईडीने समन्स बजावलेले आहेत. मात्र, ते चौकशीसाठी हजर न राहिल्यास त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी 'आप'च्या नेत्यांवर झालेली कारवाई हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Arvind Kejriwal
PM Modi VS Priyanka Gandhi: मोठी बातमी ! पंतप्रधान मोदींच्या विरुद्ध प्रियंका गांधी वाराणसीतून लढणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com