MP Sanjay Singh : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण : खासदार संजय सिंहांची सुप्रीम कोर्टात धाव

Sanjay Singh Liquor Scam : संजय सिंहांना सुप्रीम कोर्टात दिलासा मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
MP Sanjay Singh
MP Sanjay Singh Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात 4 ऑक्टोबरला ईडीकडून अटक झाली. त्यानंतर त्यांना न्यायालयाने काही दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती, पण मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्या अटकेला आणि ईडीच्या कोठडीला आव्हान देणारी याचिका त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली.

यानंतर आता दिल्ली मद्य घोटाळ्यातील अटकेविरोधात संजय सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयानंतर आता संजय सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे संजय सिंहांना सुप्रीम कोर्टात तरी दिलासा मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MP Sanjay Singh
Arvind Kejriwal News : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक होणार? आज होणार ED चौकशी

संजय सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावेळी हायकोर्टाने म्हटलं होतं की, "कायद्याच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणेवर राजकीय आधारावर काम केल्याचा आरोप करता येणार नाही", असेही कोर्टाने नमूद केले होते. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट त्यांच्या याचिकेवर काय निर्णय देतं, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातच 'आप'चे नेते मनीष सिसोदिया यांना फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. ते अद्यापही तुरुंगातच आहेत, तर याच प्रकरणात संजय सिंहांना अटक झाली. यानंतर आता याच दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले आहे.

तर या चौकशीला जाण्यापूर्वी केजरीवाल यांनी ईडीला उत्तर देत ही नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय दबावातून देण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना ईडी पुन्हा समन्स बजावण्याची शक्यता आहे.

Edited by Ganesh Thombare

MP Sanjay Singh
Sanjay Singh Liquor Scam : 'मला वर पाठवण्याची तयारी होती'; संजय सिंहांच्या आरोपाने खळबळ !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com