Delhi Liquor Scam Update : अरविंद केजरीवाल प्रचाराला मुंबईत पण दिल्लीत मोठी घडामोड; ईडीनं उचललं 'हे' पाऊल

Arvind Kejariwal News : दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी जामिनावर बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांचं बळ वाढलं आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

Delhi Liquor Scam Update : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना तब्बल 50 दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांना दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली होती.

यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जोरदार उडी घेत सभांचा धडाका लावला आहे.तसेच ते आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत आले आहेत.पण याचवेळी दिल्लीत केजरीवालांना धक्का देणारी मोठी घडामोड घडली आहे.

Arvind Kejriwal
Kolhapur Shetkari Sangh : संचालकांकडून मर्जीतल्या आधिकाऱ्यांची अर्जी; शेतकरी संघात चाललंय काय?

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार शनिवारी (ता.18) संपणार आहे.प्रचार संपण्याला काही तास शिल्लक असतानाच आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या सभांनी मुंबईत राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे.

एकीकडे शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे.या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गजनेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर दुसरीकडे महाविकास आघाडीची बीकेसीच्या मैदानावर सभा होत आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) हे हजर असणार आहे.पण केजरीवाल मुंबईत प्रचारासाठी आले असतानाच आता दिल्लीत ईडीने कथित मद्य घोटाळाप्रकरणी केजरीवालांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी जामिनावर बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांचं बळ वाढलं आहे. 4 जूननंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज पडणार नाही, असं विधानही त्यांनी एका प्रचारसभेत जाहीर केले होते. 

Arvind Kejriwal
Eknath Shinde News: 800 कोटींचा आरोप, पालकमंत्र्यांसह संपूर्ण शिंदेसेना मुख्यमंत्र्यांच्या बचावाला धावली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com