Eknath Shinde Latest News : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महापालिकेत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. (Nashik land scam News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर राऊत यांनी केलेल्या मोठ्या घोटाळ्याच्या हल्ल्याने शिवसेना शिंदे गट घायाळ झाल्यासारखी स्थिती आहे. यासंदर्भात आज पालकमंत्री दादा भुसे मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी धावून आले. त्यांनी शिंदे गटाच्या अजय बोरस्ते, भाऊसाहेब चौधरी, प्रवीण तिदमे, विजय करंजकर यांसह भाजपचे तत्कालीन स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनाही मदतीला घेतले.
यावेळी भुसे यांनी भूसंपादन घोटाळ्याच्या आरोपावर उत्तर देताना संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर राजकीय शेरेबाजी केली. ते म्हणाले, वर्षभरापासून एक भोंगा मीडियासमोर खोटे नाटे विषय सांगून जनतेची दिशाभूल करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. आम्ही प्रचारात व्यस्त असताना ही पत्रकार परिषद झाली.
मात्र, या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पहावे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील सलीम कुत्ता याच्याबरोबर डान्स पार्टी करणाऱ्यांनी हा आरोप करावा हे गंभीर आहे. जे देशद्रोह्यांच्या सोबत पार्टी करतात. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात तेच या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहे. असे त्यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा नामोल्लेख टाळून केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जो आरोप करण्यात आला आहे, त्याची शिफारस ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनीच केली आहे. त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांना प्रमोशन देण्यात आले आहे.
भूसंपादन करताना त्या प्रकरणाचा केस नंबर असतो. त्याचे मालक संबंधितांना जाऊन भेटतात तसे ते बडगुजर यांना जाऊन भेटायचे. त्यांनीच ते पत्र दिले. फाईल केली. मात्र राऊत यांना सकाळी उठून काहीही बोलायचे सवय आहे. त्यांच्याच सहकारी यात होते. या प्रकरणावर स्थगिती का आणली नाही?. त्यांचा या प्रकरणाला विरोध होता, तर यापूर्वीच ते का बोलले नाहीत असा प्रश्न पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना केला.
या संदर्भात पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, याबाबत तत्कालीन स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनी देखील सर्व आरोप हे फेटाळून लावले. महापालिकेत कोणत्याही रस्त्याचे भूसंपादन धोंडा होत नाही.175 कोटी रुपये वितरणाच्या प्रस्तावाला परवानगी दिलेली नाही. केवळ 28 ते 32 भूसंपादनाच्या प्रस्तावांना परवानगीसाठी पाठवले होते. त्याची रक्कम किती हे कुणालाही माहीत नव्हते असा दावा केला.
शिंदे सेनेचे अजय बोरस्ते यांनी संबंधित प्रकरणाला स्थगिती मिळावी यासाठी बडगुजर यांनी आपल्याकडून पत्र नेले होते. त्यानंतर त्यांनीच याबाबतचे दुसरे पत्र मागवून स्थगिती उठविण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे या प्रकरणात बडगुजर यांनीच मुख्य भूमिका बजावली असा आरोप केला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.