Delhi Mayor Election : दिल्लीच्या महापौरपदी कोण ?; शैली ओबेरॉय की शिखा राय ; आज फैसला

Delhi Mayor Election : एका नगरसेविकेमुळे निवडणुकीत मोठा झटका आम आदमी पक्षाला बसू शकतो.
Delhi Mayor Election
Delhi Mayor ElectionSarkarnama
Published on
Updated on

Delhi Mayor Election : म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली म्हणजेच एमसीडी (MCD Election)चा महापौर कोण होणार, हे आज समजणार आहे. महापौर, आणि उपमहापौर पदासाठी आज (बुधवारी) निवडणूक होत आहे. दोन्ही पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षामध्ये जोरदार लढत आहे.

महापौरपदासाठी आम आदमी पक्षाकडून शैली ओबेरॉय तर भाजपकडून शिखा राय यांच्यात थेट लढत आहे. शैली ओबेरॉय या सध्या दिल्लीच्या विद्यमान महापौर आहेत.शैली ओबेरॉय यांनी गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या रेखा गुप्ता यांचा ३४ मतांनी पराभव केला होता.

शैली ओबेरॉय यांना गेल्या निवडणूक १५० मते मिळाली होती, रेखा गुप्ता यांना ११६ मते मिळाली होती. महापौर पदासाठी एकूण २६६ जणांनी मतदान केले होते. गेल्या निवडणुकीत मोठा राडा झाला होता. अशाच राडा यंदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महापौर निवडणुकीच्या तोंडावरच आम आदमी पक्षाचे काही नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे महापौर आमचाच होणार असा दावा आम आदमी पक्ष आणि भाजपने केला आहे. पण काँग्रेसकडून या निवडणुकीबाबत कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Delhi Mayor Election
PM Modi Campaign in Karnataka : कर्नाटकच्या आखाड्यात आता मोदींची एन्ट्री ; ६ दिवसात १५ रॅली..

उपमहौपारपदासाठी भाजपकडून सोनी पांडे, तर आम आदमी पक्षाकडून मोहम्मद इकबाल यांच्यात लढत आहे. भाजप महापौर पदाच्या उमेदवार शिखा रॉय या ग्रेटर कैलाश-१ येथील नगरसेविका आहेत. जर सोनी पांडे या उत्तरपूर्व दिल्लीतील सोनिया विहार वार्ड येथील नगरसेविका आहेत.

दिल्ली महापौरपदासाठी दरवर्षी निवडणूक होते. दिल्ली महापालिकेसाठी २५० जागा आहेत, यात भाजप १०४, आम आदमी पक्ष १३४ असे बलाबल आहे. गेल्या वेळी महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीपूर्वी दोन नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले होते. त्यामुळे भाजप नगरसेवकांची संख्या १०६ झाली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी अजून आम आदमी पक्षातील एक नगरसेविका भाजपमध्ये सामील झाली आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या १०७ झाली आहे.

Delhi Mayor Election
Vaijnath Waghmare Resign : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंची शिवसेनेला सोडचिठ्ठी..

दिल्ली महापौर पदावरुन राजकारण पेटलं असताना महापौर निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीला झटका बसला आहे. तीन दिवसापूर्वी आम आदमी पक्षाच्या नगरसेविका सुनिता यांनी 'आप'चा झाडू फेकून भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. या एका नगरसेविकेमुळे निवडणुकीत मोठा झटका आम आदमी पक्षाला बसू शकतो, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com