Video Delhi Minister Atishi : विद्यार्थी, पालकांसमोर दिल्लीच्या मंत्री अतिशी स्टेजवरच ढसाढसा रडल्या; नेमकं काय घडलं?

Manish Sisodia Bail AAP : मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर आप नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
AAP Leader Atishi
AAP Leader AtishiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्लीच्या शिक्षण मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी या शुक्रवारी विद्यार्थी, पालकांसह शिक्षणांसमोर ढसाढसा रडल्या. सुप्रीम कोर्टाने पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर केला आहे. त्यावर बोलताना अतिशी यांना अश्रू अनावर झाले.

मनीष सिसोदिया मागील 17 महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. जामीन मिळाल्याने ते लवकर जेलमधून बाहेर येतील. त्यांना अटक झाली त्यावेळी ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. शिक्षण विभागाचा कारभारही त्यांच्याकडे होते. त्यांच्या अटकेनंतर अतिशी यांच्याकडे हा विभाग आला.

AAP Leader Atishi
Creamy Layer in Reservation : SC/ST क्रिमिलेअरबाबत मोठी बातमी; मोदींनी भाजप खासदारांना स्पष्टच सांगितलं...

योगायोगाने सिसोदिया यांनी पायाभरणी केलेल्या एका शाळेचे अतिशी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. आजच सिसोदिया यांनाही जामीन मिळाल्याने अतिशी भावनाविवश झाल्या. त्या म्हणाल्या, आज सत्याचा विजय झाला असून दिल्लीतील विद्यार्थीही जिंकले आहेत. सिसोदिया यांनी गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळवून दिले म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले.

सिसोदिया यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यात आले. त्यांनी दिल्लीतील मुलांचे भविष्य सुरक्षित केले. आज मी खूप आनंदी आहे. लवकर मुख्यमंत्री अरविंदे केजरीवालही जेलमधून बाहेर येतील. सिसोदिया 17 महिने जेलमध्ये होते, असे सांगताना अतिशी यांना रडू कोसळलं. स्टेजवर त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहून उपस्थितांमधील अनेकांनी सिसोदिया यांच्या नावाने घोषणाबाजी केली.

AAP Leader Atishi
Udit Prakash Rai : IAS चा कारनामा; मुख्य सचिवांच्या बनावट सह्या, राज्यपालांकडून खटला चालवण्यास मंजूरी  

दरम्यान, सिसोदिया यांना सीबीआयने मागील वर्षी 26 फेब्रुवारीला अटक केली होती. तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत. ईडीनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अटक झाल्यानंतर त्यांनी दोन 28 फेब्रुवारीला मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मागील काही महिन्यांपासून ते जामीनासाठी प्रयत्न करत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com