Rahul Gandhi News : काँग्रेससाठी धक्कादायक बातमी; सोनिया गांधी, राहुल गांधींवर दिल्लीत नवा गुन्हा दाखल, काय घडलं?

National Herald FIR 2025 : भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१४ मध्ये पटियाला हाऊस कोर्टात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात पहिली याचिका दाखल केली होती. त्यानंतर ईडी याप्रकरणात गुन्हा नोंदविला.
Rahul Gandhi News : काँग्रेससाठी धक्कादायक बातमी; सोनिया गांधी, राहुल गांधींवर दिल्लीत नवा गुन्हा दाखल, काय घडलं?
Sarkarnama
Published on
Updated on

Sonia Gandhi Rahul Gandhi FIR : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आता संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरू होण्यासाठी काही तासच उरलेले असताना दिल्लीत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात पहिल्यांदाच गुन्ह्याची नोंद केली आहे.

सोनिया गांधींसह राहुल यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा तपास मागील १० वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. पण पहिल्यांदाच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनेक वर्षांपासून तपास केला जात आहे. आता दिल्ली पोलिसही सक्रीय झाल्याने गांधी कुटुंबाच्या अडचणी वाढू शकतात.

दिल्ली पोलिसांनी ३ ऑक्टोबरला हा गुन्हा दाखल केला आहे. त्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत काँग्रेस नेत्यांनाही माहिती नसल्याचा दावा केला जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ईडी मुख्यालयाच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २००८ ते २०२४ पर्यंतच्या तपासातील माहिती तक्रारीसोबत जोडण्यात आली आहे.

Rahul Gandhi News : काँग्रेससाठी धक्कादायक बातमी; सोनिया गांधी, राहुल गांधींवर दिल्लीत नवा गुन्हा दाखल, काय घडलं?
Congress News : मोदींचं भाकित खरं ठरणार; काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, बड्या नेत्याच्या लेकानं थेट नव्या पक्षाचं नावच सांगितलं...

भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१४ मध्ये पटियाला हाऊस कोर्टात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात पहिली याचिका दाखल केली होती. त्यानंतर ईडी याप्रकरणात गुन्हा नोंदविला. सोनिया गांधी आणि राहुल यांनी नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र चालविणारी कंपनी एजेएलला चुकीच्या पध्दतीने ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. काँग्रेसने कथितपणे एजेएलला ९०.२५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. हे कर्ज कंपनी परत करू शकली नाही. त्यानंतर हे कर्ज यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडला ट्रान्सफर करण्यात आले. या कंपनीवर सोनिया गांधी तसेच राहुल गांधींचे नियंत्रण असल्याचे सांगितले जाते.

Rahul Gandhi News : काँग्रेससाठी धक्कादायक बातमी; सोनिया गांधी, राहुल गांधींवर दिल्लीत नवा गुन्हा दाखल, काय घडलं?
Ajit Pawar News : काय रे अजित पवार, पूर्वी येऊन फार बडबड करत होतास... तुझं तर काही लक्षच नाही! मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी अजितदादांची तुफान फटकेबाजी

एजेएल कंपनीच्या संपत्तीची किंमत सुमारे २ ते ५ हजार कोटी रुपये सांगितली जाते. असे असूनही यंग इंडियनने केवळ ५० लाख रुपयांत एजेएलचे ९९ टक्के शेअर खरेदी केल्याचा आरोप आहे. फसवणूक आणि पक्षाला मिळालेल्या निधीचा दुरूपयोग असल्याचा आरोप तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, कथित व्यवहारातून झालेली कमाई सुमारे ९८८ कोटी रुपये एवढी आहे. एजेएल आणि यंग इंडियनशी संबंधित व्यवहार बनावट होते, असाही आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com