Narendra Modi oath Ceremony update : मोदींच्या शपथविधीला बिबट्या? राष्ट्रपती भवनातील ‘त्या’ प्राण्याचा व्हिडिओ व्हायरल

Rashtrapati Bhawan Mystery animal : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 72 जणांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी देश-विदेशातील अनेक नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती, इतर मान्यवर उपस्थित होते.
Rashtrapati Bhawan oath ceremony
Rashtrapati Bhawan oath ceremonySarkarnama

New Delhi : राष्ट्रपती भवनात शनिवारी शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीची चर्चा जगभर सुरू असतानाच राष्ट्रपती भवनातील रहस्यमयी प्राण्याचा शपथविधीदरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक प्राणी राष्ट्रपती भवनात फिरताना स्पष्टपणे दिसत आहे. हा प्राणी बिबट्या असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. मात्र, याबाबत अद्याप केंद्रीय सुरक्षा यंत्रणा किंवा राष्ट्रपती भवन प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे गुढ वाढत चालले आहे.

भाजपचे खासदार दुर्गादास उइके हे शपथ घेतल्यानंतर सह्या करून राष्ट्रपतींच्या दिशेने जात होते. याचवेळी राष्ट्रपती भवनातील कॉरिडॉरमध्ये एक प्राणी चालत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक महत्वाचे नेते, उद्योगपती सेलिब्रिटी, इतर महत्वाचे मान्यवर हजर होते.

Rashtrapati Bhawan oath ceremony
Suresh Gopi : मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा बॉम्ब टाकणारे सुरेश गोपी मोदी-शाहांसाठी ‘सुपरस्टार!    

शपथविधी राष्ट्रपती भवन तसेच परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त होता. अशावेळी भवनामध्येच एक रहस्यमय प्राणी दिसून आल्याने चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियात याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. कुणी या प्राण्याला बिबट्या म्हणत आहे तर कुणी पाळीव मांजर किंवा कुत्रा. काहींनी राष्ट्रपती भवातील सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com