CJP Delhi Protest : 'पाठीवर व्रण पडले, तरी मारत राहिले'; दिल्लीतील लाठीचार्जने संतापाची लाट, प्रियंका गांधी आक्रमक

Priyanka Gandhi On Abhijit Dipke CJP Delhi Protest : कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनावेळी संसदेच्या दिशने जाणाऱ्या मोर्चा पोलिसांनी आडवला. तसेच यावेळी लाठीचार्ज करण्यात आला.
CJP Delhi Protest; Congress MP Priyanka Gandhi
CJP Delhi Protest; Congress MP Priyanka Gandhisarkarnama
Published on
Updated on

CJP Protest March : कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलन पुकारले असून आज 'चलो संसद' आंदोलनाचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर दिल्लीत लाखोंच्या संख्येने विद्यार्थी जमले असून ते संसदेच्या दिशेने निघाले. यावेळी या नियोजित मोर्चाला सरकारने पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे आता समोर आले आहे. येथे पोलिसांनी एकीकडे सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले, तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आहे.

आता या घटनेचे व्हिडिओ समोर येत असून एका आंदोलक विद्यार्थ्यावर लाठी चालवल्याचे समोर आले आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचाही आक्रमक पवित्रा समोर आला असून तो "मला मारा... संपवा," असे म्हणत आहे. तर या सर्व घडामोडींवर काँग्रेस नेत्या तथा खासदार प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त करत, "आपली मुलं आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज कशाला?" असा सवाल सरकारला केला आहे.

दिल्लीत सुरू असलेले कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन तीव्र झाले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहील, अशी आक्रमक भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी घेतली आहे. तर हे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकार दबाव वाढवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे आता समोर आले असून त्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर जंतर-मंतर येथे लाठीचार्ज करत आंदोलकांना ताब्यात घेतले जात असल्याचेही समोर आले आहे.

अशातच एका आंदोलकाचा व्हिडिओही समोर आला असून पोलिसांनी त्याच्या पाठीवर व्रण येईपर्यंत मारहाण केल्याचे दिसत आहे. मात्र, लाठीचार्जनंतरही हा आंदोलक मागे हटण्यास तयार नसून तो आक्रमकपणे पोलिसांनाच, "मला मारा... संपवा," असे म्हणत आहे. त्याच्या या आक्रमक भूमिकेनंतर इतर पोलिसांनी मागे न हटता त्याला मारहाण सुरूच ठेवली. त्याच वेळी एका महिला पोलिसाने त्याला बाजूला करत इतर आंदोलकांकडे दिल्याचेही आता समोर आले आहे.

या सर्व घडामोडींवरून आता दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका होत आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या तथा खासदार प्रियंका गांधी चांगल्याच संतापल्या. त्यांनी या लाठीचार्जवरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत. तसेच, "आपली मुलं आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज कशाला?" असा सवालही केला आहे.

एकीकडे सर्वजण सरकारला चर्चा करा, असे म्हणत आहेत. आपल्या शिक्षण व्यवस्थेत काही त्रुटी असून इतरही काही अडचणी आहेत. मात्र, सरकार यावर बोलायला आणि चर्चा करायला तयार नाही. उलट विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा मारा आणि लाठीचार्ज केला जात आहे. हे कशासाठी, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com