Goa News : 'या' राज्यात दोनच जिल्हे; तिसऱ्या जिल्ह्यासाठी विधानसभा सभापती आग्रही

Goa third district Ramesh Tawadkar : काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा हे तालुके मिळून तिसरा जिल्हा व्हावा, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांनीच केली आहे. रवी नाईक हे तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी भाजपमध्ये गेल्याचे सांगत होते.
Ramesh Tawadkar
Ramesh Tawadkar sarkarnama
Published on
Updated on

Goa News : गोवा हे राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. राज्य छोटे असले तरी येथील प्रशासकीय व्यवस्था चांगली आहे. गोव्यामध्ये उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोन जिल्हे आहेत. गोव्यामध्ये तिसरा जिल्हा असावा, यासाठी मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक आग्रही आहेत.

भाजपमध्ये येण्याचे कारण देखील ते तिसऱ्या जिल्ह्याची मागणी हेच असल्याचे सांगतात. आता सभापती रमेश तवडकर यांनी देखील तिसऱ्या जिल्ह्याच्या मागणीचे समर्थन केले आहे.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनासाठी सभागृहात दाखल होत असताना सभापती तवडकारांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तिसऱ्या जिल्ह्याच्या मागणीचे समर्थन केले.

काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा हे तालुके मिळून तिसरा जिल्हा व्हावा. हा आदिवासी भाग आहे. तिसरा जिल्हा झाल्यास त्याचा विकास होण्यास मदत होईल, असे मत सभापती तवडकर यांनी व्यक्त केले.

Ramesh Tawadkar
Jagan Mohan Reddy : बहीण शर्मिला यांना सोबत घेऊन जगनमोहन चंद्राबाबूंना घेरणार?

रवी नाईक यांना टोला

रवी नाईक हे तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी भाजपमध्ये गेल्याचे सांगत होते. त्यामुळे आमदार विजय सरदेसाई यांनी तिसऱ्या जिल्ह्याच्या मागणीवरुन रवी नाईकांना डिवचले. मंत्री होऊन त्यांचे मंत्रिपद जाण्याची वेळ आली तरी तिसरा जिल्हा काही झाला नाही, असे सरदेसाई सभागृहात म्हणाले.

(Edited By Roshan More)

Ramesh Tawadkar
Mahavikas Aaghadi CM News : कोण असेल मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा, ठाकरे, पटोले की पाटील?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com