बाबा राम रहीमनं तुरुंगात पाऊल टाकताच 24 तासांत ठरला पुन्हा सुटण्याचा मुहूर्त?

विधानसभा निवडणुकांआधी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा तुरुंगातून बाहेर आला होता.
Gurmeet Ram Rahim and Manohar Lal Khattar
Gurmeet Ram Rahim and Manohar Lal Khattar Sarkarnama

चंडीगड : पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांआधी डेरा सच्चा सौदाचा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) हा तुरुंगातून बाहेर आला होता. हरियानातील भाजप (BJP) सरकारने त्याला 21 दिवसांचा फर्लो रजा मंजूर केली होती. पंजाबमधील मतदान पूूर्ण झाल्यानंतर अखेर राम रहीम पुन्हा तुरुंगात दाखल झाला आहे. यानंतर 24 तासांतच तो तुरुंगातून पुन्हा बाहेर येण्याची चर्चा सुरू झाली असून, यासाठी हरयानातील पंचायत निवडणुकांचा मुहूर्त निघू शकतो. (Baba Gurmeet Ram Rahim Latest News)

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राम रहीमला झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. आता तो पुन्हा तुरूंगात गेल्यानंतर 24 तासांतच तो पुन्हा बाहेर येण्याची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी हरियानातील आगामी पंचायत निवडणुकांचा मुहूर्त शोधण्यात आल्याचे बोलले जात आहे. कारण राम रहीमचे पंजाबमध्ये जेवढे अनुयायी आहेत, तेवढेच हरियानात आहेत. त्यामुळे त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो. याचे संकेत भाजप सरकारनेही दिले आहेत. राम रहीमला फर्लो मंजूर करण्यासंबंधी प्रतिज्ञापत्र हरयाना सरकारने न्यायालयात दाखल केले होते. यात राम रहीम हा सराईत गुन्हेगार नसल्याची ग्वाही सरकारने दिली होती.

याआधी एकदा हरयानातील भाजप सरकारने राम रहीमला पॅरोल नामंजूर केला होता. यासाठी सरकारने सुरक्षेचे कारण दिले होते. मात्र, पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याला फर्लो मंजूर करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. कारण राम रहीमचे सुमारे 40 लाख अनुयायी आहेत. त्याला तुरुंगातून बाहेर काढल्याचा भाजपला किती फायदा हे विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून समोर येणार आहे. राम रहीमच्या दिमतीसाठी झेड प्लस सुरक्षा दिल्याबद्दल भाजपवर टीकाही झाली होती.

Gurmeet Ram Rahim and Manohar Lal Khattar
ममतांच्या लाटेसमोर सगळेच हतबल! भाजप, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही

राम रहीमचे पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका (Assembly Election) डोळ्यासमोर ठेवून भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशात या दोन्ही राज्यात राम रहीमचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत. त्यामुळे त्याला 21 दिवसांची फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे. याचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. भाजपने राम रहीमला तुरुंगातून बाहेर काढून मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. राम रहीम हा 2017 पासून तुरुंगात आहे.

Gurmeet Ram Rahim and Manohar Lal Khattar
मोहीम फत्ते! बाबा राम रहीम 21 दिवसांनी पुन्हा तुरुंगात

साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये सुनावली होती. नंतर 2021 मध्ये त्याला 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. डेरा व्यवस्थापक रणजितसिंग यांच्या खून प्रकरणात राम रहीम आणि चौघांना केंद्रीय विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. राम रहीम 13 लाख रुपये तर इतर चौघांना 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. रणजितसिंग याचा 2002 मध्ये खून करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com