ममतांच्या लाटेसमोर सगळेच हतबल! भाजप, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर सगळे विरोधी पक्ष हतबल झाले आहेत.
Mamata Banerjee
Mamata Banerjee Sarkarnama

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासमोर सगळे विरोधी पक्ष हतबल झाले आहेत. राज्यातील 108 महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांपैकी (Civic Polls) 102 ठिकाणी तृणमूलने विजय मिळवला आहे. डाव्यांना केवळ एका ठिकाणी विजय मिळाला असून, भाजप आणि काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही.

डाव्या पक्षांनी एकमेव विजय मिळवला असून, ताहेरपूर महापालिकेत त्यांनी विजय मिळवला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत 77 जागा जिंकून भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला होता. परंतु, भाजपला (BJP) आता एकाही ठिकाणी सत्ता मिळवता आलेली नाही. काँग्रेसचीही (Congress) तीच अवस्था आहे. ममता बॅनर्जींच्या करिष्म्यासमोर सगळेच विरोधी पक्ष नाकाम ठरले आहे. तृणमलूने 102 ठिकाणी विजय मिळवला असून, 31 ठिकाणी विरोधकांना खातेही खोलता आलेले नाही. यामुळे पुन्हा एकदा ममतांनी बंगालवर निर्विवाद आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे.

Mamata Banerjee
ममतांकडून पराभवाची परतफेड! सुवेंदू अधिकारींच्या बालेकिल्ल्याला लावला सुरूंग

या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले होते. या निवडणुकीत एकूण 2 हजार 171 जागा आहेत. त्यातील तब्बल 994 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. याचबरोबर तृणमूलने 456 जागांवर आघाडी घेतली आहे. याचवेळी अपक्षांनी 83 जागा मिळवल्या आहेत. भाजपला 46 जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेसला 32 तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 20 जागा मिळाल्या आहेत. भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस हे एकाही महापालिका अथवा नगरपालिकेत आघाडीवर नाहीत.

Mamata Banerjee
दे धक्का! महापालिका अन् नगरपालिका निवडणुकांत भाजप, काँग्रेसची धूळधाण

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली होती. ममतांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने बाजी मारत कोलकता महापालिकेत मोठा विजय मिळवला होता. राज्यात नुकत्याच झालेल्या विधाननगर, सिलिगुडी, चंदननगर आणि असनसोल या चार महापालिकांत तृणमूलने सत्ता मिळवली होती. चारही महापालिकांत तृणमूलने बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळवून भाजप, काँग्रेससह डाव्या पक्षांना धूळ चारली होती. त्यामुळे या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांकडे लक्ष लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com