Dhairyasheel Mane's Speech in Parliament: आम्ही दहशतीखाली आहोत, खासदार धैर्यशील मानेेंचं संसदेत गाऱ्हाणं

Dhairyasheel Mane: दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बसवत समन्वय घडवून आणावा..
Kolhapur Politics| Dhairyashil mane|
Kolhapur Politics| Dhairyashil mane|sarkarnama
Published on
Updated on

Dhairyasheel Mane : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटत आहे. सीमावादावर महाविकास आघाडीच्या खासदारांसह शिंदे गटाच्या खासदारांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह धैर्यशील मानेंचा देखील सहभाग आहे. माने यांनी सीमावर्ती भागातील माणूस प्रचंड दहशतीखाली आहे असून सीमावादाचा मुद्दा सोडविण्यासाठी केंद्र सरकारनं मध्यस्थी करावी अशी मागणी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.

Kolhapur Politics| Dhairyashil mane|
MLA Nilesh Lanke News : निलेश लंकेंची तब्येत खालावली; तीन किलो वजन झाले कमी

खासदार धैर्यशील माने यांनी सीमावादाचा मुद्दा लोकसभेत उचलून धरला.

यावेळी माने म्हणाले, सीमावासियांच्या मनात अत्यंत दहशतीचं वातावरण आहे. तिथला मराठी माणूस पिचला आहे. त्या माणसाला न्यायदेवतेकडून न्यायाची अपेक्षा आहे. पण त्याच्याबरोबरच आता कर्नाटकमधील राज्य सरकार व मुख्यमंत्री असे काही विधानं करत आहे, ज्याच्यामुळे तिथले नागरिक हवालदिल झाले असून सीमेवर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याठिकाणी मोर्चा, आंदोलन केले जात असून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात दडपशाही करत आहे. तेथील कन्नड वेदिका रक्षण समितीकडून मराठी माणसांवर अन्याय केला जात आहे. हा अन्याय शासन पुरस्कृत आहे की काय असा प्रश्न उभा राहतो.

Kolhapur Politics| Dhairyashil mane|
Amit Shah to Meet Both CMs : तारीख ठरली ; अमित शाह घेणार दोन्ही मुख्यमंत्र्यांची भेट

मी स्वत: तज्ञ समितीचा अध्यक्ष असून दोन्ही राज्याचं काम करत आहेत. आता केंद्र शासनाने महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बसवत समन्वय घडवून आणावा. आणि दोन्ही राज्यांमध्ये चांगलं वातावरण राहण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करावी असे देखील खासदार माने यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com