MLA Nilesh Lanke News : निलेश लंकेंची तब्येत खालावली; तीन किलो वजन झाले कमी

MLA Nilesh Lanke News : निलेश लंकेंच्या उपोषणाला आज तिसरा दिवस
MLA Nilesh Lanke
MLA Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

MLA Nilesh Lanke News : अहमदनगर जिल्ह्यातील विविध महामार्गाची दुरावस्था झाली आहे. या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.

लंके यांच्या समवेत राष्ट्रवादीचे (NCP) काही कार्यकर्त्येही उपोषणाला बसले आहेत. डॉक्टरांनी आज लंके यांच्यासह उपोषणकर्त्यांची तपासणी केली. लंकेंची तब्येत काहीशी खालावली असून त्यांचं तीन किलो वजन कमी झालं असल्याचं सांगण्यात आलंय. पण काळजी करण्यासारखं काही नाही, असंही डॉक्टर म्हणाले आहेत.

आरणगाव, चिंचोडी पाटीलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'रस्ता रोको' आंदोलन करत आमदार लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. तर जिल्हाभरातील अनेक गावांनी लंकेंच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

MLA Nilesh Lanke
Brij Bhushan Singh: राज ठाकरेंच्या आदेशानंतर बृजभूषण सिंहांचं मोठं विधान; म्हणाले, आम्ही पैलवान...

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील विविध महामार्गाच्या मागणीबाबत लवकर तोडगा न निघाल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार यावर नेमकं काय निर्णय घेतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

निलेश लंके यांची मागणी नेमकी काय?

अहमदनगर ते पाथर्डी-शेवगाव, अहमदनगर ते कोपरगाव, अहमदनगर ते करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी लंके यांनी केलीय. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उत्तरावर समाधान झालं नाही. त्यामुळे लंके गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.

MLA Nilesh Lanke
Love Jihad Act : हिवाळी अधिवेशनात येणार लव्ह जिहाद विरोधी कायदा?

आंदोलनाला विविध पक्षाचा पाठींबा

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील विविध महामार्गाची दुरावस्था झाली आहे. या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र तरीही याकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यामुळे निलेश लंके (Nilesh Lanke) हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. तर या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस (Congress), मनसे (MNS), शिवसेना (Shiv Sena) (ठाकरे गट) या पक्षांनी पाठींबा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com