

New Delhi News: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बेरोजगार तरुणांना झुरळ संबोधल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली होती. याच संतापाच्या उद्रेकातून अभिजीत दीपकेनं कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी डिजिटल चळवळ उभारली. या सीजेपीच्या लढ्याला अवघ्या सव्वा दोन महिन्यांतच मोठं यश आलं आहे.
तरुणांच्या कॉक्रोच जनता पार्टीनं मोदी सरकारला झुकवलं आहे. तब्बल 12 वर्षे संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधकांना न जुमानणाऱ्या मोदी सरकारला सीजेपी समोर अखेर एक पाऊल मागे घ्यावं लागलं. आंदोलकांच्या तीन मुख्य मागण्यांपैकी एक असलेल्या शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधानांच्या राजीनामा आता झाला आहे. यानंतरच्या दोन मागण्याबाबत सकारात्मक असल्याचं शुक्रवारी झालेल्या सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर समोर आलं होतं. याचदरम्यान, आता काँग्रेसच्या युवा नेत्यानं नवा राजकीय बॉम्ब टाकला आहे.
काँग्रेसचे युवा नेते कन्हैय्या कुमार यानं सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश आल्यानंतर सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आणखी एक मोठी मागणी केली आहे. यामुळे भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे.
कन्हैया कुमार म्हणाले, "आम्ही आता तर कुठे सुरूवात केली आहे. पुढे अजून लढाई बाकी आहे. धर्मेंद्र गेले, आता नरेंद्र मोदी यांचा राजीनाम्याची वेळ आहे. आपल्या पोस्टमध्ये कन्हैया कुमार यांनी पुढे लिहिले, "ही उत्तरदायित्वाची सुरुवात आहे... हे असंच सुरू राहील असंही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच कन्हैय्या कुमार यांनी शुक्रवारी(ता.24) सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर दोन ट्विट केले आहेत. त्यांनी मोदीजी, 'कठोर कारवाई' या शब्दाने समस्या सुटणार नाही; आपल्याला लीकप्रधान यांच्या राजीनाम्यापासून सुरुवात करावी लागेल. जबाबदारी कदाचित मेलडीच्या चॉकलेटसारखी गोड नसेल, पण लोकशाहीत ती अत्यावश्यक असल्याचं म्हणत कन्हैय्या कुमारांनी भाजपसह मोदी सरकारला डिवचलं आहे.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मोदीजी, तुम्ही तुमच्या फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवता आणि मागच्या दाराने विद्यार्थ्यांना मारहाण करवता. कालच बिहारमध्ये गोळीबार झाला. शेकडो विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाटणा विद्यापीठाच्या अध्यक्षांना अटक करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या नेत्यानं यापुढे देशात हा ढोंगीपणा चालणार नसल्याचं मोदी सरकारला ठणकावलं आहे. कन्हैय्या कुमारनं यावेळी संपूर्ण देश जंतर मंतर बनला असल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला जबाबदारी घ्यावीच लागेल आणि लीकप्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल असंही इशारा दिला आहे. तसेच मोदीजी, तुम्ही 'मित्रांना' हवं तितकं 'मित्र' म्हणू शकता, पण तुमचं वलय आता उणेपणा ठरल्याचा टोलाही त्यांनी भाजप मोदींना लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.