Digital Arrest : पंतप्रधान मोदींना ज्याची भीती ते जोमात सुरू; ED ची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेचे 3.8 कोटी लुटले

Senior woman duped of 3.8 crore as scammers misuse ED threat: डिजिटल अरेस्टवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नुकतेच सावध राहण्याचे आवाहन केले होते.
Pm Narendra Modi
Pm Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : देशातील डिजिटल अरेस्टचे प्रकार थांबताना दिसत नाही. मुंबईतील एका ज्येष्ठ महिलेकडील तब्बल 3.8 कोटी लुबाडल्याचे समोर आले आह. मनी लाँर्डिंग प्रकरणात तुम्हाला अटक होऊ शकते, असे फोनवरून सांगत त्यांच्याकडून सातत्याने पैशांची मागणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनांबाबत काही दिवसांपूर्वीच नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आहे.

मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित महिलेला एका व्यक्तीकडून व्हॉट्सअप कॉल आला होता. तैवानला पाठवण्यात आलेले तुमचे पार्सल पकडण्यात आले असून त्यामध्ये पाच पासपोर्ट बँक कार्ड, चार किलो कपडे आणि औषधे असल्याचे त्यावरून सांगण्यात आले. हे पार्सल आपले नसल्याचे सांगत संबंधित व्यक्तीने आधारकार्डवरील माहिती तुमचीच असल्याचे सांगत मुंबई पोलिस अधिकाऱ्याकडे फोन ट्रान्सफर करत असल्याचे सांगितले.

Pm Narendra Modi
CM Pramod Sawant: मुख्यमंत्री ठरले 'लक फॅक्टर'! महायुतीतील प्रचार ठरला लाभदायी

प्रत्यक्ष मुंबई पोलिस अधिकारी बनावट होता. आधार कार्ड मनी लाँर्डिंग केसशी जोडले गेल्याचे महिलेला सांगण्यात आले. स्काईप अप डाऊनलोड करून त्याद्वारे संपर्कात राहण्यासही सांगितले. संबंधित व्यक्तींनी आपली ओळख आयपीएस आनंद राणा आणि आर्थिक विभागातील अधिकारी म्हणून जॉर्ज मॅथ्यू सांगितली होती. महिलेला ईडीच्या दोन बनावट नोटिसाही पाठवण्यात आल्या होत्या. त्यात गंभीर आरोप करण्यात आले होते.

महिलेला बँक खात्यांची माहिती देऊन त्यावर सगळे पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. काही गडबड आढळून न आल्यास सर्व पैसे परत पाठवले जाईल, असे पटवून देण्यात आले. व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर चोवीस तास राहण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी जवळपास एक महिने घरातील संगणकावर व्हिडिओ कॉल ऑन ठेवला होता.

Pm Narendra Modi
Chinmay Krishna Das Prabhu : बांग्लादेशात हिंदू नेत्याला अटक; देशद्रोहाचा खटला चालणार?

महिलेने सुरूवातीला 50 लाख रुपये पाठवले. ते पैसे संबंधितांनी परत पाठवले. त्यानंतर पतीच्या खात्यातील पैसे पाठविण्यास सांगितले. आधीचे 50 लाख परत आल्याने महिलेला खात्री पटली होती. त्यामुळे इतर बँक खात्यातून 3.8 कोटी रुपये पाठवले. पण ते पैसे परत आले नाहीत. संबंधितांनी आणखी पैसे पाठवण्यास सांगितले. महिलेला शंका आल्यानंतर मुलीला सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर मग पोलिसांत तक्रार करण्यात आली आणि डिजिटल अरेस्टचा प्रकार समोर आला.

पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेचे आवाहन

डिजिटल अरेस्टच्या घटना रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. या फसवणुकीच्या घटनांमध्ये संबंधितांना आधी लोकांची खासगी माहिती एकत्रित केली जाते. त्यानंतर त्यांच्याभोवती भीतीचे वातावरण तयार केले जाते. आणि त्यानंतर वेळेचा दबाव टाकला जातो. लोक इतके घाबरून जातात की विचारही करत नाहीत.

कुणाला अशाप्रकारचा फोन आला तर घाबरून जाऊ नका. अशा प्रकरणांमध्ये डिजिटल सुरक्षेसाठी तीन उपाययोजना करायला हव्यात. थांबा, विचार करा आणि त्यानुसार कार्यवाही करा, असे मोदी म्हणाले होते. फोन आल्यानंतर शक्य असल्यास स्क्रीनशॉट काढा किंवा रेकॉर्डिंग करा. कोणतीही सरकारी यंत्रणा फोन करून अशाप्रकारे धमकी देत नाही आणि पैशांचीही मागणी करत नाही. या घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर कॉल करा, पोलिसांकडे तक्रार करा, असा सल्लाही त्यांनी दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com