Karnataka Election Result: कर्नाटक निवडणुकीत आणखी एक विक्रम; तीन सख्खे भाऊ झाले पुन्हा आमदार

Karnataka Election Result 2023: कर्नाटकच्या राजकारणात जारकीहोळी बंधूंचीच चर्चा
Karnataka Election Result
Karnataka Election ResultSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 224 जागांपैकी जवळपास 135 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला फक्त 65 जागांवर विजय मिळाला. जेडीएसला केवळ 19 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसनं कर्नाटकात जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपला मात्र, सत्ता राखण्यास यश आलं नाही.

कर्नाटक निवडणुकीत बेळगावमधील तीन भावांचा विजय झाला आहे. त्यामुळे या तीन भावांची संपूर्ण कर्नाटकमध्ये चर्चा होत आहे. या तीन भावांपैकी दोघांनी काँग्रेसकडून तर एकाने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली.

Karnataka Election Result
Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; मोदींनी केलं काँग्रेसचं अभिनंदन, म्हणाले...

यामध्ये सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळवला. ते यमकनमर्दी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी जवळपास 60.42 टक्के मते मिळवली आहेत.

तर भालचंद्र जारकीहोळी हे अरभावी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार भीमप्पा गुंडप्पा गडग यांचा पराभव केला आहे.

Karnataka Election Result
Karnataka Election Result: कर्नाटकच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस अन् 'जेडीएस'च्या 'या' बड्या नेत्यांचा पराभव

तर रमेश जारकीहोळी यांनी गोकाक विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. याआधी देखील तेच या मतदारसंघातून निवडून आले होते.

दरम्यान, कर्नाटकच्या राजकारणात जारकीहोळी बंधूंचा मोठा दबदबा आहे. जारकीहोळी हे पाच जण भाऊ असून यापैकी चार भाऊ राजकारणात सक्रीय आहेत. जारकीहोळी बंधूंची साधी राहणी पण राजकारणावर मोठी पकड आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com